Home Breaking News तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप

तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप

हिमायतनगर प्रतिनिधी /अंगद सुरोशे भुमीराजा न्युज

उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे तेजमल गांधी कृषी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाचशे झाडे व पंधराशे सीडबॉल लावून भूजप्पा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आला तेजमल गांधी कृषी विज्ञान विद्यालय चेअरमन राज्य राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्राचा सन ऑफ द सोईल या पुरस्काराने सन्मानित असलेले डॉक्टर विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांनी बोलताना विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाबद्दल माहिती दिली मानव जीवनासाठी ऑक्सिजन हा फारच महत्वाचा असून ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात कशामुळे मिळतो तर आपल्याला या झाडापासून ऑक्सिजन मिळत असतो यांचं महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमांमध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील प्रमुख मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती ब्राम्हगावचे सरपंच परमात्मा जी गरुडे साहेब तसेच उपसरपंच यांचे प्रतिनिधी गोरे सामाजिक कार्यकर्ते अशोकरावजी निमलवाड विशंभर लंकलवाड रत्नाकर मुक्कावार अरविंद धबडगे भुजंगा उंदरटवाड सुभाष कोंडवाड रामदास घोडेकर चातारी इथून आलेले प्रतिष्ठित नागरिक गजानन भाऊराव माने चंद्रकांत जी पवार तसेच भाजपाचे उपाध्यक्ष गजानन वाघमारे निळकंठ वाघमारे मोक्षदान समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य गण उपस्थित होते डॉक्टर विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात शिक्षक अशोकरावजी शिरफुले तेजमल गांधी कृषी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पेंटेवाड पर्यवेक्षक एकबोटे मॅडम पांडुरंग माने वानखेडे सर अनिल पवार गावंडे सर जोशी सर येथील ब्राह्मणगाव येथील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleआगामी पोळा, गणेशोत्सव धन्यवा सणानिमित्त पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे उद्या शांतता कमिटी बैठकीचे आयोजन……
Next articleप्रधानमंत्री पिकविमा योजना सुविधा केंन्द्राचे उद्घाटन