Home Breaking News टीईटी गैरव्यवहार : नाशिक जिल्हयात 39 शिक्षकांचे वेतन बंद

टीईटी गैरव्यवहार : नाशिक जिल्हयात 39 शिक्षकांचे वेतन बंद

—— अन्यथा संबंधित शाळा मुख्याध्यापकांवरही कारवाई

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

शिक्षक पात्रता परिक्षेत बोगस प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 39 जणाचा या टीईटी गैरप्रकारात समावेश सिद्ध झाल्याने तातडीची कारवाई म्हणून त्यांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे या प्रकरणात ज्या शाळामधील शिक्षक सहभागी असल्याचे सिद्ध होईल. तेथील मुख्यध्यापकांवरही अशाच स्वरुपाची कारवाई केली जाणार असल्याचे माध्यमिक विभागाचे वेतन पथकाचे अ धीक्षक उदय देवरे यांनी सांगितले.
त्याबरोबरच सिन्नर आणि पेठ येथील दोघा शिक्षक़ेतरांवरही याच स्वरुपाची कारवाई करण्यात आली असून शासनाच्या निर्देशांनुसार या सर्वाविरोधात कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय शिक्षक संख्या अशी
बागलाण 5, चांदवड 8, देवळा 1, दिंडोरी 1, कळवण 3, मालेगांव 5, नांदगांव 5, नाशिक 7, निफाड 3, पेठ 1,
शिक्षक़ेतर कर्मचारी
सिन्नर 1, सुरगाणा 1

Previous articleहिमायतनगर येथे शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी!
Next articleआगामी पोळा, गणेशोत्सव धन्यवा सणानिमित्त पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे उद्या शांतता कमिटी बैठकीचे आयोजन……