भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१
हिमायतनगर /-
आज हिमायतनगर (वाढोणा) नगरीत, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तारलेली आहे असे सांगणारे, परमपूज्य, लोकशाहीर,साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने आयोजित रॅलीत सामिल होवून त्यांच्या क्रांतिकारक विचारांना मानवंदना अर्पण करुन उपस्थित समस्त समाज बांधवांनी अभिवादन केले.स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज दि 21 ऑगस्ट रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडून सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या
व उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ व काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष जनार्दन ताडेवाड यांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर उपस्थित नवतरुण युवकांच्या अग्रहास्तव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ यांनी डि. जे च्या गाण्यावर ठेका घेतला तेव्हा नव तरुण युवकामध्ये चागलाच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले तेव्हा सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कमिटी कडून प्रमुख मान्यवरांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ , शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष जनार्दन ताडेवाड, शहराध्यक्ष संजय माने ,पंडित ढोणे, बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल, लक्ष्मण डांगे,दिनेश राठोड,संतोष बनसोडे, शाहीर गुंडेकर,संदीप गुंडेकर, गंगाधर गायकवाड, धोंडोपंत बनसोडे, चंदू भालेराव , सह आदी समाज बांधव व कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी होते