Home गुन्हेवृत्त कार चोरी करणाऱ्या टोळीस हिमायतनगर पोलिसाने केले गजाआड…

कार चोरी करणाऱ्या टोळीस हिमायतनगर पोलिसाने केले गजाआड…

👉🏻हिमायतनगर पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी,
रविकुमार पवार खडकीकर
– ७३५०३३३४१५

हिमायतनगर/-
पोलीस स्टेशन हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे फिर्यादी देवजी मारुती माजळकर राहणार वाळकेवाडी यांनी तक्रार कार चोरी विषयीची पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे तक्रार दिली होती.
सविस्तर वृत्त असे की, मारुती माझंळकर रा.वाळकेवाडी यांनी चार चाकी टाटा विक्टर कार क्रमांक MH 26AK -2440 ही त्यांचे मित्र शिवाजी माने रा. वाघी यांना वापरण्यासाठी दिली होती व ती विस्टा कार अंदाजे दोन लाख रुपये हि ११/०८/२०२२ चे रात्री कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेली वगैरे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे दि.१२/०८/२०२२ रोजी गू.र.नं.१९०/२०२२ कलम ३७९ भादवी खालील प्रमाणे अज्ञात चोरांविरुद्ध दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, यातील कार चोरी करणारे अज्ञात आरोपी तुकाराम करपे आणि गजानन नागोराव माने हे दोघे रा. मौजे वाघी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील असून त्यांनी ती का चोरून तालुका लोहा येथील पेट्रोल पंपाजवळ नेऊन सोडल्याची माहिती मिळताच वरुण सदरची कार कि.अं. दोन लाख रुपये ही पोलीस स्टेशन येथे आणून गुन्ह्यात जप्त केली व यातील आरोपी संतोष तुकाराम करपे व गजानन नागोराव माने दोघे राहणार मौजे वाघी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड हे दि.२०/०८/२०२२ रोजी जळगाव रेल्वे टेशन वर असल्याची माहिती मिळाली यावरून त्यांना शिताफीने आरोपीस आज रोजी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
वरून आरोपीस आज रोजी वि. कोर्टात हजर केले असता त्यांचा दि.२२/०८/२०२२ पावेतो रिमांड मिळाला असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री प्रमोद शेवाळे सा. पोलीस अधीक्षक सा. श्री. विजय कबाडे सा. अप्पर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती अर्चना पाटील, मा. पोलीस निरीक्षक श्री. बी.डी. भुसनर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. जी. महाजन, पोहेका/ नामदेव पोटे, पोहेका/ हेमंत चोले, पोहेका / अशोक शिंगणवाड, नापोका/ श्याम नागरगोजे, चालक, सफो / मिलिंद कात्रे यांनी पाडली आहे.

Previous articleउत्कर्ष ज्ञानपीठ निंबा फाटा येथे दहिहंडी उत्सव साजरा
Next articleहदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भाजप बूथ_सशक्तिकरण_अभियानाला सुरुवात..