हेमंत शिंदे नाशिक संपादक
नाशिक येथील त्रबंकरोड भूखंड समाजकल्याण विभागाकड़े हस्तांतरित
गेल्या पंचवार्षिकमध्ये तत्कालीन बीजेपी – सेना युतीच्या सरकारने अर्थसंकल्पीय आधिवेशनात धनगर समाजातील मुलांसाठी नाशिक विभागीय स्तरावर वसति गृह उभारण्याची घोषणा केली होती. मात्र 2019 नंतर हा विषय मागे पाडला जाऊन धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुस ण्यात आली होती. दरम्यान तीन महिन्यापूर्वी राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. शिंदे सरकारने धडाडीचे निर्णय घेतांना नाशिक मधील वसतिगृहासाठी जागा हस्तांतरणाचे तातडीने आदेश दिले.
त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाधरन डी आणि निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोड़े यांच्या मार्गदर्शनाख़ाली त्रबंकरोड वरील दुग्ध विकास योजनेचा 5 हजार स्क़ेअरमीटरच्या भूखंडावर धनगर समाजातील मुला-मुली साठी सुस ज्ज वसतीगृह उभारन्याचा निर्णय घेण्यात आला, व जिल्हाधिका-र्याच्या आदेशानुसार गुरुवार ( दि.19) रोजी हा भुखंड समाजकल्याण विभागाकड़े हस्तांतरीत करण्यात आला. मंडळ अधिकारी अनिल रोकडे यांनी समाजकल्याणचे निरीक्षक विष्णू थोरात यांच्याकड़े जमिनिचि कब्जेपावती सुपुर्द केली. वसतिगृहाच्या जमिनिसाठी सामाजिक कार्यकर्ता आर. पी. कुं वर, विजय हाके, किरण थोरात, सुनिल सोर, विष्णू थोरात आदींनी पाठपुरावा केला.