ठाणे प्रतिनिधी बुधवार दि. १७ आॕगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजता दापोडे, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोकण प्रदेश अंतर्गत, राजापूर तालुका शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या ” बालगुणगौरव महोत्सव २०२२ ” या कार्यक्रमात शंकरसुत श्री. संदिप तोडकर कोकण प्रदेश कार्याध्यक्ष यांनी संकलित/संपादित केलेल्या १०५ देशभक्तीपर काव्यरचनांचा ” मातृभूमी ” या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार डाॕ. अ. ना. रसनकुटे कोकण प्रदेश अध्यक्ष यांच्या शुभहस्ते, तसेच विशेष अतिथी श्री. शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगीताई काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्षा, डाॕ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा, श्री. सुरेश मेहता महाड तालुका अध्यक्ष आणि इतर व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आला. या काव्यसंग्रहाला डाॕ. अ. ना. रसनकुटे यांची दर्जेदार प्रस्तावना लाभली आहे.
सदरहू काव्यसंग्रहाच्या निर्मितीसाठी श्रध्दा पाटील, जगदीश म्हात्रे, प्रेमनाथ नाईक आणि दिनेश पाटील यांचे मोलाचे
सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला राजापूर तालुका शाखेच्या अध्यक्षा सौ. सुयोगा जठार, माननीय सरपंच व सदस्य यांच्या विशेष सहकार्याने आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम भारदस्त झाला.
शाळेतील मुलांचे मधूर समूहगीत, वैयक्तिक गीत, वकृत्व व सादरीकरण अप्रतिम व उपस्थितांची दाद मिळवून गेलं. या मुलांचे कौतुक करून त्यांना
मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आलं. अनेक मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणं
झाली. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांची मेहनत प्रशंसनीय ठरली व कार्यक्रची सांगता झाली.