परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्हा परिसरातील शिवारात जुलै महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली.कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस पडल्यामुळे अधूनमधून महिनाभर शेत शिवारातील नदी नाले पुराने तुडुंब भरुन वाहत होते. पुराचे पाणी पिकात घुसून जमीनी खरडून गेल्या. शिवाय, जमीनीत सतत पाणी साचत राहिल्याने खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी व ईतर पिके धोक्यात आली. पिके पिवळी पडून त्यांची वाढ व फांद्या विस्तार खुंटला. परिणामी, खरीप हंगाम अतिवृष्टी पाऊसाने हिरावून नेला. परंतु, अतिवृष्टीग्रस्त पिकाची पाहणी व पंचनामे कृषी खाते व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी करुन अतिवृष्टी आनूदान मिळण्यासाठी शासनाकडे माहिती पाठवली नाही. या कामात नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांनच्या पिकाची पाहणी पंचनामे करुन महसूल आयुक्ताकडे आनूदान मागणी केली आहे.त्या तुलनेत परभणी जिल्ह्यातील सबंधित अधिकाऱ्यांनी या कामात अनियमितता दाखवून शेतक-यांच्या तोंडाला पाणी पुसली. ही बाब उजेडात येताच परभणी जिल्ह्यातील शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री शिंदे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख माधव कदम,सरपंच संघटनेचे पूर्णा तालुकाध्यक्ष चंद्रकांत सुर्यवंशी उर्फ चांदू पाटील यांनी शेतक-याप्रती कृतज्ञता दाखवत थेट मुंबई गाठवून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन जाहीर करण्यात आलेली अतिवृष्टी आनूदान मदत हेक्टरी १३६०० रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी. असी मागणी चर्चा करुन करण्यात आली. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना तात्काळ सुचना आदेश देऊन परभणी जिल्हा आनूदानापासून वंचित राहता कामा नये,असेही सुचीत करण्यात आल्याने आता जिल्ह्यातील कृषी व महसूल खात्याचे सबंधित अधिकारी अतिवृष्टीग्रस्त पिक पाहणी व पंचनामा करण्याच्या कामाला लागली असल्याचे समजते. मध्यंतरी आनूदानापासून परभणी जिल्हा वगळा? अशा अफवांना शेतकरी वृगात पेव फुटला होता. परंतु,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माधव कदम तसेच माजी खासदार सुरेश जाधव,सहसंपर्क प्रमुख भास्कर दादा लंगोटे, उपजिल्हा प्रमुख केशव कदम, सरपंच संघटना अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुर्यवंशी,एकनाथ लोखंडे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करीत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवसेना नेते माधव कदम टिमचे शेतकरी वर्गातून अभिनंदन केले जात आहे.
Home Breaking News परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना अतिवृष्टी आनूदान देण्यासाठी माधव कदम टिमने केली मुख्यमंत्र्याकडे मागणी