मा.आमदार विनायकराव मेटे यांच्या निधनाने…. शोककळा पसरली….
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 14 आॅगष्ट 2022
मराठवाडा हा भाग महाराष्ट्र राज्यातील काही भागांपैकी विकासाच्या दृष्टिकोनातून एक मगासलेलाचं भाग म्हणावं लागेल..पण याच मराठवाड्यातील भुमीने देशाला अनेक राजकीय दिग्गज नेते आणि थोर स्वातंत्र्यसेनानी दिलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील वायफणेकर अश्या एक नाही तर अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी ज्यांनी हैद्राबाद निजामशाहीतुन असलेला मराठवाडा मुक्त करण्यासाठी प्राणाची आहुती दिली. असे अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांनंतर देशाचे नेते स्वर्गीय तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब, शिवसेना नेते , लोकप्रिय आमदार प्रकाश खेडकर, अत्यंत लोकप्रिय नेते स्व. प्रमोदजी महाजन, मा. केंद्रिय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, स्वर्गीय केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे, उत्कृष्ट सांसदरत्न पुरस्कार प्राप्त तथा ओबीसी नेते खा. राजीवजी सातव, व कोरोणा काळात काळाच्या पडद्याआड गेलेले माजी मंत्री गंगाधरराव कुटुंरकर, माजी मंत्री विमलताई मुंदडा आणि त्यांनंतर आज ज्यांच्या जाण्याने अख्खा मराठा समाजचं नाही तर मराठवाडा पोरखा झाला. असे लोकप्रिय, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. जनसामान्यांचा आधारवड असलेले नेते मा. आमदार विनायकराव मेटे साहेबांचं सकाळी कारअपघातात निधनं झालं. खरं तर या बातमीवर सुरुवातीला विश्वासचं बसतच नव्हता. परंतु हळूहळू मिडीयावर बातम्या आल्या. आणि लोकप्रिय, लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचं निधनं झालं. लोकांमध्ये एकच चर्चा होती ती आपल्या मराठवाड्याला दृष्ट लागली आहे का? वरील सर्वच नेत्यांनी स्वतःची पर्वा न करता जनसामान्यांच्या आवाज म्हणुन उभे टाकलेले असतांना अचानक काळानं घाला घातला…हि बाब अपचनिय तर आहेचं परंतु मनाला दुःख, वेदना देणारी आहे.
त्यांच्या कुटुंबीयांना ईश्वर या दुखातुन साव-यासाठी शक्ती देवो. हिचं भुमी राजा साप्ताहिक न्युज चॅनल नांदेड च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…….💐💐