Home Breaking News मराठा आरक्षणाचे नेते विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठवाड्यावर पसरली शोककळा!

मराठा आरक्षणाचे नेते विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठवाड्यावर पसरली शोककळा!

:- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गत अनेक वर्षांपासून “एक मराठा लाख मराठा”छताखाली सबंध महाराष्ट्रभर जिवाचे रान करुन आंदोलन उभारणारे मराठा नेते, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक,अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्यासाठीच्या कमिटीचे अध्यक्ष, आमदार बिड जिल्ह्याचे सुपूत्र मराठा समाजाच्या समस्या शासनदरबारी लावून धरत अहोरात्र धडपडणारे नेते विनायकराव मेटे यांचे तारीख १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ५ वाजता दरम्यान पूणे-मुंबई हायवे रोडवर त्यांच्या कारला जोराचा अपघात झाला.अपघातात त्यांच्या शरिराला गंभीर मार लागून ते जखमी झाल्याने अपघातस्थळीच उपचारा पूर्वी त्यांचे दु:खद निधन झाले. मराठ्यांच्या नेत्याचं अकाली आणि असं दुर्दैवाने अपघाती निधन झाल्यामुळे महाराष्ट्र राज्या बरोबरच विशेष करुन संपूर्ण मराठवाड्यावर त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.त्यांचे आपल्यातून जाण्याने सकल मराठा बांधवासाठी रविवारची पहाट ही काळ पहाट म्हणून उजडली.गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी सरकार कुणाचे जरी असले तरी त्यांनी सकल मराठा बांधव आणि शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून सातत्याने लढा उभारला. मराठा समाजाला कायदेशीर रित्या पक्के आरक्षण मिळवून देणारच, असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते चोवीस तास चिंतेत असायचे. कायदेशीर अभ्यासपूर्ण पध्दतीने त्यांनी मराठा आरक्षणासाठी न्यायालयातही लढा दिला. त्यांच्या हयातीत मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे होती परंतु तसे झाले नाही. त्यांचा लढा, त्यांचे मराठा समाजाप्रतीचे स्वप्न अधुरे राहीले. महाराष्ट्रात नव्याने शिंदे-फडवणीस सरकार स्थापन झाल्याने मराठा आरक्षण मिळणार, असी अशा त्यांना पल्लवीत झाल्या होत्या. आणि याच मराठा आरक्षणाच्या कामासाठी ते बिड येथून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करुन बैठकीला जाण्यासाठी निघाले होते. परंतु वाटेतच त्यांच्या कारला अपघात होवून काळाने त्यांच्यावर घाला घालून मराठा समाजाला पोरकं केले. त्यांच्या अपघाताची व अकाली जाण्याची बातमी रविवार १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सोशियल मिडीया, टि व्ही चॅनवर धडकताच. अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.त्यांच्या जाण्याचा विश्वासच बसत नव्हता.मराठा आरक्षणासाठी जिव ओतून रात्रंदिवस झगडणारे ते एकमेव नेतृत्व होते.त्यांच्या अपघाती निधना बद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी दु:ख व्यक्त करुन एक लढावू, हुशार, अभ्यासू आणि गरिबांसाठी काम करणारा तळमळीचे नेतृत्व महाराष्ट्रांने गमावलं.असा दु:खद संदेश व प्रतिक्रिया दिल्या असून स्व:विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनानंतर आता बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा विभागात एकच शोककळा पसरली आहे. जनता त्यांच्या दु:खद बातमीने स्तब्ध झाली आहे.

Previous articleस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिमायतनगर काँग्रेसतर्फे काढण्यात आली भव्य पदयात्रा रॅली …
Next articleराजकारणातील मराठवाड्याने अनेक नेते गमावले!