Home Breaking News शहरातील कासारखेड भागात चोरट्यांचा धुमाकुळ

शहरातील कासारखेड भागात चोरट्यांचा धुमाकुळ

कृष्णा घाटोळ भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर

अकोला जिल्ह्यातील बाळापुर ‌शहरातील कासारखेड भागात गेल्या कित्येक दिवसापासुन चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे आणि त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे . अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असुन गुरूवारी रात्री बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या चोरट्यांचा चोरीत कोणताही मुद्येमाल हाती लागला नाही.हि घटना शेजारच्यांच्या निदर्शनास दुसर्या दिवशी आली .
शहरातील कासारखेड भागात राहणारे माजी मुख्याध्यापक सुर्यभान काळे यांच्या बंद घराचे कुलूप आणी कडी कोंडा तोडुन घरात घुसुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरातील कपाट तोडुन आणी त्या कपाटातील सामानांची फेक फाक केली.घरातील लोखंडी तिजोरीचे लाॅक तोडले.मात्र चोरट्यांची हाती काही लागले नाही .हि गोष्ट शेजारचांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली.पोलीसांना चोरीची माहीती प्राप्त होतास पोलिसांनी स्थळी धाव घेवुन घटनास्थळाची पाहणी केली असता त्या चोरीत चोरट्यांच्या हाती काहि लागले नाही . असे त्या चोरीत माहीती पडले .सदर घटनेचा तपास बाळापुर पोलीस करत आहेत.

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त बोरगडी तांडा नं -२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकांनी तिरंगा झेंड्याचे केले घरोघरी वाटप …
Next articleअहिल्यादेवी होळकर सभागृहात समाजकंटकांकडून तोडफोड़