Home Breaking News तुळजा भवानी विद्यालयात वृक्षाला राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा!

तुळजा भवानी विद्यालयात वृक्षाला राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा!

परभणी, ( आनंद ढोणे):- पूर्णा तालूक्यातील पिंपळा लोखंडे येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या तुळजा भवानी विद्यालयात विद्यार्थीनींनी चक्क वृक्षाला राखी बांधून पर्यावरण जोपासण्याच्या हेतूने दि ११ ऑगस्ट २०२२ रोजी रक्षाबंधन साजरा केला. यात, ईयत्ता दहावी वर्गातील तनूजा पायल जोगदंड,श्वेता डाखोरे,वैष्णवी लोखंडे,पल्लवी जोगदंड, मुक्ता जोगदंड, तनूजा ढोणे,गायत्री ढोणे,आरती ढोणे,शुभांगी जाधव,अंजली कापूरे,भाग्यश्री ढोणे सह अनेक विद्यार्थीनींचा सहभाग होता.यावेळी,मुख्याध्यापक भुसारे, खेबाळे, ओम लोखंडे, मुकाडे, बनसोडे, भोसले, कविता मॅडम या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व विषद केले. सदरील, तुळजा भवानी विद्यालय हे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुला मुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वर्ष १९९५ ला पिंपळा लोखंडे येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव लोखंडे, उत्तमराव ढोणे पाटील (पांगरा) यांनी येथे अथक परिश्रम घेत तुळजा भवानी विद्यालयाची स्थापना केली आहे.शाळेला जागा अवश्यक असल्याने गावातील संस्थापक अध्यक्ष तथा दानशूर व्यक्ती लोखंडे बांधवांनी जमीन दान देवून पिंपळा लोण( बू) रोडवर लोकवर्गणीतून सुसज्ज ईमारत बांधली आहे. येथील विद्यालयात दरवर्षी ईयत्ता दहावीचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत असतात.शिवाय, येथील मुख्याध्यापक भुसारे,खेबाळे, ओम लोखंडे, मुकाडे, बनसोडे, उगले,भोसले, कविता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी (गणतंत्र दिन) या व उत्सव रोजी समाजपयोगी विविध सामाजिक उपकृम राबवले जातात.विद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी विद्यालयाचे अध्यक्ष उत्तमराव लोखंडे, उपाध्यक्ष उत्तमराव ढोणे संचालक मंचकराव लोखंडे,यु डी लोखंडे, गणेश लोखंडे, भालेराव सर,बहिर्जी महाविद्यालय वसमतचे मा प्राचार्य नवनाथ लोखंडे यासह ग्रामस्थ सातत्याने प्रयत्नशील असतात. येथील विद्यालयात पिंपळा लोखंडे, लोण बु, लोण खु, पांगरा, वाई, मरसुळ व अन्य गावचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. सदर, विद्यालयात शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबरच स्पर्धा परीक्षा, संगणक, क्रीडा, वृक्तत्व स्पर्धा आदी विषयी शिक्षण दिले जाते.

Previous articleपंचवीस वर्षांनी सवना ज. सोसायटी अखेर बिनविरोध
Next articleभारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भव्य रॅली