हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
6 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री मा. महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या जातीय जणगणना करावी या मागणी करता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश या सह अनेक राज्यामधील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
या आंदोलना प्रसंगी महादेव जानकर यांनी ओबीसी वरील 70 वर्षापासून होत असलेल्या अन्यायाचा पाढ़ा वाचला व आतातरी नरेंद्र मोदींनी जातीय जणगणना करुन ओबीसीना आर्थिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात ओबीसीना हक्काचा वाटा दयावा अशी मागणी केली.
ओबीसीच्या जातीय जणगणना करण्याचा निर्णय न घेतल्यास पुढच्या वेळी संसदेत घुसून आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा दिला.
प्रतिक्रिया -:
ओबीसी महासभेची जातीनिहाय जणगणना व्हावी व ” जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी ” या न्यायिक तत्वाला हरताळ फासून मुठभर असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेकडून बहुजन असणाऱ्या ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख भूमिका राहिले आहे.
ओबीसीची जातीय जणगणना करावी या मागणीचे स्वागत करण्यात येत आहे.
हेमंत शिंदे
( नाशिक जिल्हा संघटक )
अखिल भारतीय ओबीसी महासभा