Home Breaking News स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वानी साजरा करावा. 👉 प्रा. के.डी. कदम सर.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वानी साजरा करावा. 👉 प्रा. के.डी. कदम सर.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 08 आॅगष्ट 2022

आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या दैशाविषयी राष्ट्रभावना जागृत होऊन, राष्ट्राभिमान प्रत्येकांच्या मनात रुजवावा. म्हणुन केंद्र सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या मोहिमेत अंतर्गत हरघर तिरंगा घोषवाक्या प्रमाणे सर्वांनी घरोघरी लावावा. असे प्रतिपादन हु.ज. पा. उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगरचे समाजशास्त्र विभागाचे प्रा. के.डी कदम सरांनी केले आहे. आपल्या ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत या तिरंगी ध्वजाचे सर्वांना वितरण करण्यात येईल. हा ध्वज आपल्या घरावर कसा लावावा. यासाठी प्रा. वसंत जाधव सरांनी नागरीकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले ध्वजाचा सर्वात वरचा जो केसरी रंग हा ‘वर’ ठेवून मध्ये पांढरा आणि खालच्या बाजूस हिरवा रंग राहील याची खात्री करुनच ध्वज लावावा. लक्षात येत नसेल तर, शेजा-यांना विचारून ध्वज लावावा. एका लाकडी काठी घेऊन त्यामध्ये ध्वज लावावा. ध्वजाचा अवमान होणार नाही. यांची सर्वांनी काळजी घ्यावी. दिनांक 13 आॅगष्ट ते 15 आॅगष्ट 2022 रोजी सायंकाळ प्रयंत ठेवुन, नंतर सायंकाळी पाच वाजता ध्वज खाली घेऊन व्यवस्थीत घरी घडी करून ठेवावा. असेही ते म्हणाले. प्रा. वसत कदम सर, प्रा. जाधव सर आणि ग्रामपंचायत सदस्य व सर्व नागरीक उपस्थित होते.

Previous articleमराठवाड्यात पून्हा अतिवृष्टीला दमदार सुरुवात!
Next articleओबीसीची जातीय जनगणना व्हा वी या करिता राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा दिल्ली मध्ये जंतर मंतर वर एल्गार