Home कृषीजागर मराठवाड्यात पून्हा अतिवृष्टीला दमदार सुरुवात!

मराठवाड्यात पून्हा अतिवृष्टीला दमदार सुरुवात!

२०२२ खरीप हंगामाला वरुणराजाकडून “गुड बाय”!!
परभणी, (आनंद ढोणे) :- महाराष्ट्रा बरोबरच मराठवाडा विभागातील आठही जिल्हा परिसर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीलाच म्हणजे सरत्या जूनपासून आणि सबंध जुलै महिन्यात सर्वत्र अतिवृष्टी पाऊसाने हाहाकार उडवला. तोच पून्हा ऑगस्ट महिन्यात देखील कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस चालूच आहे. अधूनमधून एक दोन दिवस उघडीप होवून अशाच जमीनी कोरड्या पडायला लागल्याकीच लगेच पाऊस सुरु होतो.तर आता ७ ऑगस्ट पासून झडवजा रिमझिम पाऊस चालू झालाय. नव्याने अतिवृष्टी सुरु झालीय. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, ज्वारी, उडीद, तीळ, बाजरी, मका ह्या पिकाच्या मुळीलाच पाणी लागलेय.जमीनीतलं पाणीच हटत नसल्याने वाफसा नाही,सातत्याने सूर्यदर्शन नाही,उन्हं प्रकाशा अभावी पिकांची वाढ विस्तार होत नाही. त्यामुळे पिके नष्ट होताहेत नव्हे ती संपूर्णपणे वायाच गेलीत.कुठेतरी उंचवटा जमीनीवरील आणि बेडवर लागवड केलेलीच सोयाबीन तग धरुन दिसतात त्याचीही उत्पादकता ५० टक्के पेक्षा अधिक घटणार आहे तर सखल क्षेत्रातील सगळी खरीप पिके पिवळी पडूनसडून जात असल्याने यंदाच्या खरीप हंगामाला वरुणराजा च्या अतिवृष्टी अवकृपा दृष्टीने “२०२२ खरीप हंगामाला गुड बाय” दिला आहे.अशा दररोजच्या अतिवृष्टी पाऊसाने शेतकरी चिंतातुर झालाय. तरीही अजून शुध्दा बाधीत पीक क्षेत्राच्या पिकाचे पंचनामे नाहीत. नांदेड वगळता अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त पिकाकरीता एनडीआरएफ नियमानुसार आनूदान मिळण्यासाठी विभागीय आयुक्ताकडे माहिती पाठवून नुकसान भरपाईची मागणी केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अतिवृष्टीने पुरता नेस्तनाबूत होत आहे. महाराष्ट्र राज्याचे जाणते आणि शेतक-यांचे दु:ख जवळून पाहता स्वतः शेती करत असताना अनूभव गाठीला असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कशाचीही वाट न पाहता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आनूदान जाहीर करत मराठवाडा- विदर्भ विभागात ओला दुष्काळ त्वरित घोषित करुन शासनस्तरावरुन सर्वोतोपरी मदत द्यावी. या मागणी करीता सकल शेतकरी बांधव आर्त टाहो फोडताना पहावयास मिळत आहेत.महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच राज्य मंत्रीमंडळ विस्तार होताच त्याचवेळी महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ विभागात ओला दुष्काळ जाहीर करतील असी अशा शेतक-यांना लागली आहे.

Previous articleकेंद्रीय कृषीमुल्य आयोगाचे पाशा पटेल आणि गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा वसमत येथे सत्कार आयोजित
Next articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वानी साजरा करावा. 👉 प्रा. के.डी. कदम सर.