Home राजकारण केंद्रीय कृषीमुल्य आयोगाचे पाशा पटेल आणि गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा वसमत येथे...

केंद्रीय कृषीमुल्य आयोगाचे पाशा पटेल आणि गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा वसमत येथे सत्कार आयोजित

हिंगोली, (आनंद ढोणे) :– महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांची व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांची केंद्र सरकारच्या कृषीमूल्य आयोग समितीवर नियुक्ती झाल्याने त्यांचा ९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्य जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या प्रसंगी, वसमत येथील व्यापारी वर्गाशी “व्यापार निती” या विषयावर चर्चा केली जाणार आहे तसेच व्यापा-यांच्या अडचणीची कारणे, यावर देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे सर्व व्यापारी बंधू आणि वर्गाने अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे वसमतनगर तालुकाध्यक्ष तथा वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, शेतकरी नेते गोरख पाटील यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमास वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकासाभिमुख नेतृत्व राजू भैय्या नवघरे हे उपस्थित राहणार आहेत. शिवाय, ह्या सदर कार्यक्रमाला शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष देवीप्रसाद ढोबळे, शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष उत्तमराव वाबळे, शेतकरी संघटना कर्मचारी आघाडी जिल्हाप्रमुख ईंजी. व्ही डी शिरपूरकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

Previous articleकविता
Next articleमराठवाड्यात पून्हा अतिवृष्टीला दमदार सुरुवात!