Home Breaking News स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती. 👉भावी उमेदवारच्या आशा आकांक्षेवर फिरले पाणी……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती. 👉भावी उमेदवारच्या आशा आकांक्षेवर फिरले पाणी……

  1.  ् @वार्तापत्र @

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 07 आॅगष्ट 2022

महाराष्ट्र राज्यांत नविन सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नवनवीन निर्णय घेण्यात आले आहेत.मविका आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जे निर्णय घेतले होते. त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. आणि शिंदे गट शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे युतीच्या या सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली. गेल्या वर्षभरापासून अनेक भावी उमेदवारांनी गुढघ्याला बाशिंग बांधून ठेवले होते. मीच भावी जिल्हा परिषद, पंचायतीचा आणि नगरपंचायतचा भावी उमेदवार म्हणून…..काहींनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन, अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी वर्षभरापासून हजेरी लावतांना दिसुन आले . त्यात काही नविन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाची निर्मीती झाली. त्यानंतर नविन गटात मलाच पक्ष टिकीट देणार म्हणुन, मीच आगामी भावी उमेदवार असे म्हणत, आपला ससेमिरा मिरवत होते. सोशल मिडियावर आपल्या नेत्यांचा फोटो लावुन स्वःताचा फोटो लावत खुपच प्रचार केला. परंतु नविन सरकारने जुन्या सरकारचे निर्णयात बदल करुन नवीन निर्णय घेऊन जुन्या निर्णयाला स्थगिती दिल्याने, भावी उमेदवारांचे डोले सध्यातरी पाण्यात पडल्याचे दिसत आहेत.
राजकारण सातत्य ठेवुन सतत जनसामान्यांच्या प्रश्नांची उकल करावी लागते. लोकांच्या सुखदुःखात धावुन जाणारा आपला माणुस म्हणुन सेवा केल्यास, अडीअडचणीच्या वेळी सहकार्य करावे लागते. त्यामुळे मतदार नेहमीच साथ देत असतो. अशी बोलकी प्रतिक्रिया लोकांनी बोलुन दाखवली आहे.

Previous articleबियाणे, खते, किटकनाशके यांच्या किमती वाढल्या; पण नुकसानीचे निकष नाही बदलले…
Next articleमोबाईलंच्या विळख्यात पडली तरुणाई…. 👉 दृष्टिक्षेप