मारोती अक्कलवाड पा. सवनेकर. जिल्हा संपादक नांदेड. दिनांक – 05 आगष्ट 2022
यावर्षी सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महागडे बि-बियाणे, खते आणुन पेरणी केली. पण पाऊस पाचविलाच पुजंला होता. शेतात पाणी साचुन शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. हवामान खात्याने अजुन 04 आगष्ट ते 08 आगष्ट या दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
महसुल विभागाने शेतीचे पंचनामे केले आहेत. 70 टक्के नुकसान दाखवुन तसा रीपोर्ट पाठविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज रोजी शेतीची परीस्थिती खूपच बिकट झाली आहे.
90 ते 95 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. असावेळी महसूल विभागाने 70 टक्के नुकसान दाखवुन काय साध्य केले. हाही प्रश्न शेतकरी बांधवांनी बोलुन दाखविला आहे. सोयाबीन, कापुस, तुर, ज्वारी, हळद या पिकाची वाढ कमालीची खुंटली आहे. मुग, उडीद तर पुर्णपणे केले आहेत.
तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.