Home Breaking News

पांगरा येथे पडली घरावर विज,बालंबाल टळली जिवितहानी!
———–
परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे तारीख ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७:४५ वाजे दरम्यान अचानक आलेल्या पाऊसात आकाशात मेघगर्जनेसह विजेच्या गडगडाटा बरोबरच घराच्या टाॅवरवर पडली विज. सुदैवाने माणसं घरात असल्याने बालंबाल जिवितहानी टळली आहे.
या विषयी सविस्तर माहिती असी की, पांगरा लासीना येथील शेतकरी नागरीक कुंडलीक बाबाराव ढोणे यांनी गावाबाहेरील पूर्णा प्रकल्पाच्या कालव्या लगत गावठाण जमीन प्लाॅटींग गट क्रमांक २५ मध्य नवीन पक्के सिमेंट काँक्रीटचे घर बांधून त्यांचे कुटूंबीय तेथे वास्तव्यास असते. तारीख ४ ऑगस्ट २०२२ रोजी उजडता पासूनच आकाशात नभ दाटून येत पाउसाचे हवामान होते. अशातच सकाळी ७ वाजल्यापासून रिपटिप पाऊसास सुरुवात झाली होती. यावेळी हळूहळू आकाशात ढग दाटून येवून पाऊसाच्या सरी वाढल्या असताना मेघगर्जनेसह विजेचाही कडकडाट होत होता. अशातच ७:४५ वाजे दरम्यान अचानक एक विज कुंडलीक बाबाराव ढोणे यांच्या घरावरील टाॅवरच्या कोप-यावर कोसळून चाटून गेली. या प्रसंगी, प्रकाशाचा एकच लखलखाट होवून जोराचा जिव हेलावून टाकणारा “तड्डेलकून” विज कोसळ्याचा आवाज आला. पाहतो तर काय..छतावरती विज कोसळल्याचे दिसून येत टाॅवरच्या कोप-यावरील कठडे विजेच्या मा-याने फूटून सिमेंट विटांचे तुकडे लांब उडून गेले. ईतक्यात पाऊस आल्यामुळे घरात बसलेले किरण कुंडलीक ढोणे, माणिक कुंडलीक ढोणे,आजी अभयबाई बाबाराव ढोणे व त्यांच्या मावशी ह्या विजेचा मोठा प्रकाशमय लखलखाट आणि जोराचा कांठाळ्या बसवणारा आवाज ऐकून एकदम सुन्न झाल्या. खोलीत धुराचा लोळ निर्माण होत एकदम काळाकुट्ट समोरील काहीही न दिसायचा अंधार झाला. त्यांच्या हातापायाला मुंग्या आल्या.काय झाले क्षणभर कळालेच नाही.सर्वजण घाबरुन गेले. मात्र विजेच्या धक्याने कोणतीही जिवितहानी न होता ती बालंबाल टळली. विज कोसळ्याने घरातील हिटर जळून धुर निघाला. विद्युत बल्ब शाॅट झाली. वायरींग जळाली.मात्र जिवाला काही धोका नाही झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.विजेच्या पाॅवरमुळे गावातील खांबावर बल्ब लागल्याचे गावकऱ्यांनी पाहीलेचे सांगितले.

प्रतिक्रिया:-१) पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही घरात बसलो होतो ईतक्यात घरावर एकदम जोराचा तड्डेलकून आवाज येत छतावर विज कोसळल्याचे समजले. याप्रसंगी, प्रकाशाचा एकदम लखलखाट घरादारात चमकून दिसला आणि जोरदार आवाजाने एकच हल्लकल्लोळ उडाला घरात धुरासह अंधार झाला. आम्ही हादरुन जावून घाबरोलत. हातपायाला मुंग्या येवून शरीर हादरुन जीव कासावीस झाला. विज पडण्याचा हा प्रथमच नैसर्गिक प्रकार पाहून आनूभवला मात्र कोणतीही जिवितहानी झाली नसल्याने सावरलोत.

किरण कुंडलीक ढोणे संपर्क:९३२५००५९९५

२) आमचे घर शेजारीच असून पाऊस आल्यामुळे मी स्वयंपाक घरात बसलेले होते. एवढ्यात प्रकाशाचा मोठा लखलखाट होवून घरादारात एकच उजेड पडला. विज पडल्याचा मोठा आवाज येवून घरातच हादरुन उचलून फेकल्यासारखे झाले. मातर जिवाला काही झाले नाही. शेजारी कुंडलीकाच्या घरावर आकाशातील विज पडल्याचे समजले. पंढरीच्या पांडुरंग कृपेने व तरंगल हनुमान पाठीराखा झाल्यामुळे जिवाला काही झाले नाही.


गंगाबाई बेगाजी ढोणे
रा पांगरा ता पूर्णा.

Previous articleओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण द्या
Next articleसततच्या पावसामुळे पिकांची अपेक्षित वाढ खुंटली.