Home Breaking News शिक्षकांना आता एक तारखेला वेतन नाशिक जिल्हयात सेवा हमी कायदा आंतर्गत प्रक्रिया

शिक्षकांना आता एक तारखेला वेतन नाशिक जिल्हयात सेवा हमी कायदा आंतर्गत प्रक्रिया

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयतील कर्मचाऱ्याचे वेतन दरमहा एक तारखेला वर्ग होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त, उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, आयडीबीआय बैंक यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य होत आहे.
खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांना एक तारखेला वेतन होण्याची मागणी मुख्याध्यापाक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्य वतीने अनेक वर्षापासून करण्यात येत होती.
आता यापुढे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यावर वेतन अदा करताना मुख्याध्यापकांच्या विवरणपत्राशिवाय शाखानिहाय पगाराची रक्कम जमा होणार आहे. वेतन वर्ग होण्यात होणारी दिरंगाई दूर करण्याची मागणी सर्व संघटनांकडून करण्यात येत होती.
या मागणीची दखल घेऊन विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छीन्द्र कदम, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे आणि आयडीबीआय बैंक़ेच्या मुख्य शाखेतील अधिकारी वर्गोंने थेट वेतन अदा करण्याच्या प्रक्रिये चा कृती कार्यक्रम ठरविला आहे. ऑगष्ठ महिन्याचे वेतन जिल्ह्यातील शिक्षकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. शिक्षकांच्या वैयक्तिक खात्यावर वेतन रक्कम जमा झाल्याने कर्मचाऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Previous articleमनसे कामगार संघटनेच्या वतीने प्रसाद वाटप
Next articleओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण द्या