Home राजकारण लोकनेते बाबुराव कदम युवा मंचच्या वतीने निवघा बाजार येथे कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम...

लोकनेते बाबुराव कदम युवा मंचच्या वतीने निवघा बाजार येथे कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम संपन्न…

हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या जनतेच्या आग्रहानेच बाबुराव कोहळीकर लवकरच शिंदे गटात करणार प्रवेश….

हदगाव तालुका प्रतिनिधी
रवीकुमार पवार खडकीकर
७३५०३३३४१५

हादगाव प्रतिनिधी /-
तालुक्यातील निवघा बाजार येथे मा. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या युवा मंचाच्या वतीने कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम शिवपार्वती मंगलकार्यात आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान बाबुराव कदम कोहळीकर यांनी जनसमुदायाच्या उपस्थितीत एक मोठे आव्हान केले की मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता की आपण आमच्या गटात घेण्याची शिफारस केली होती पण मी असा एकाएकी निर्णय घेत नाही असा बाबुराव कदम यांनी सांगितले आहे या विषयावरच कार्यकर्त्यांच्या परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मी जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असल्याचे बाबुराव कदम कोहळीकर मंच्यावर बोलताना म्हणाले.
हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या जनसमुदायाच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असून शेतकऱ्याला व त्या विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रमाणिकपणा घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी मी शिंदे कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार प्रवेश करण्यास उत्सुक असलो तरी हिमायतनगर व हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून घेऊनच शेतकरी राज्याच्या हितासाठी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा माजी जिल्हा परिषद सदस्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या आजच्या बैठकीमध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभेचे हजारो संख्येने जनसमुदाय ,कार्यकर्ते उपस्थित होते,या कार्यक्रमात कार्यकर्ता ने एकच नारा गुजला की साहेब तुम्ही शिंदे गटात जा शिंदे गटाशी हातमिळवणी करा, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

हदगाव तालुक्यातील ननिवाघा बाजार येथील शिव पार्वती मंगल कार्यालयामध्ये आज हदगाव विधानसभा मतदार संघाचे लोक नेते तथा जिल्हा परिषद सदस्य बाबुराव कोळेकर यांनी कार्यकर्ता परिसंवाद मेळाव्याचे आयोजन होते. या कार्यक्रमाला हिमायतनगर हदगाव तालुक्यातील शेकडोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सदरच्या कार्यकर्त्याने आपली उपस्थिती लावून या कार्यक्रमाची तुफान गर्दी दाखवून विरोधकांच्या उरात धडकी भरवून सोडलीआहे. अपक्ष उमेदवार असलेले बाबुराव जी कोहलीकर कर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात झालेल्या सर्व कार्यकर्त्यांची शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आग्रह केला आहे.

Previous articleलवकरच अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश….
Next articleसाहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी …..