हदगाव तालुका प्रतिनिधी. (रवीकुमार पवार ) 7350333415
हदगाव प्रतिनिधी,/- तालुक्यातील अतिशय डोंगरी भागाच्या किनारी ९००वर्षांपूर्वीचे केदारगुडा येथे महादेव मंदिर आहे. तेथे गेल्या ९०० वर्षापासून श्रावण मासानिमित्त पूर्ण श्रावण महिन्यात यात्रा भरत असते पण मागील दोन वर्षा मध्ये जगात आलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व धार्मिक स्थळावर निर्बंध लावून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. मात्र यावर्षी श्रावण मासानिमित्त यावर्षी यात्रा भरून भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले असल्याचे केदारनाथ मंदिर संस्थांचे महंत मृत्युंजय भारती यांनी भक्तांसाठी खुले असल्याचे सांगितले परंतु यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी कोरोनाचे
निर्बंध परिपूर्ण हटवले नसल्यामुळे तोंडाला मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवून फक्त गणांनी दर्शनाच्या लाभ घ्यावा असे आवाहन महंत मृत्युंजय भारती यांनी भक्तांसाठी केलेले आहे…