Home Breaking News शहरात मोकाट जनावरांचा वाहनधारकांना त्रास. बंदोबस्त करावा नागरीकांची मागणी.

शहरात मोकाट जनावरांचा वाहनधारकांना त्रास. बंदोबस्त करावा नागरीकांची मागणी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर                    जिल्हा संपादक नांदेड.                              दिनांक- 30 जुलै 2022

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा वाहनधारकांना खूपच त्रास होत आहे. नगरपंचायतने या जनावरांचा बंदोबस्त करून वाहनधारकांची हेळसांड थांबवावी. अशी मागणी नागरिकांची होत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. नांदेड – किनवट महामार्गावर हिमायतनगर शहर हे मुख्य बाजारपेठ आहे. तेलंगणा आणि विदर्भातील लोकांसाठी हिमायतनगर रेल्वेस्थानकावर आहे. त्यामुळे नागरीकांची येणे जाणे जास्त आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
म्हणुन नगरपंचायतने लवकर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून, वाहनधारकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

Previous articleपरभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
Next articleयावर्षी हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले…