👉🏼शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत….
हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड बोरगडीकर 9145043381
हिमायतनगर/-
जुलै महिन्याच्या अतिपावसाने , तालुक्यातील परिसरामध्ये हाहाकार गाजवले, या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची, पिकांची अवस्था पाहिली
असता डोळ्यात अश्रू येईल, अशी शेतकऱ्यांचा स्थिती आज रोजी हलाकीची आहे. संततधार पावसामुळे अत्यंत दुर्दैवी आज उपासमारीची वेळ शेतकरी गोरगरीब कष्टकरी मायबाप शेतकऱ्यांवर आली आहे, पैनगंगा नदीकाठच्या आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,
या वर्षीच्या जुलै महिना ठरला शेतकऱ्यांसाठी अतिशय दुःखदायक! ,
यासाठी प्रशासनाने ही बाब तातडीने लक्षात घेऊन पंचनामे न करता तात्काळ माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी मायबापांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत सरसकट जाहीर केले पाहिजे, आणि नदी,नाल्या, काठावरील शेतीतलं तर पिकासह माती सुद्धा वाहून गेली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांंना वेगळा मोबदला मिळाला पाहिजे आणि अनेक वेळा शासन दारी निवेदना द्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून सुद्धा या बाबीकडे प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे लवकरात लवकर प्रशासनाने ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकऱी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरनार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.