अतिवृष्टी मध्ये उरलेली पिकेही आता नष्ट होण्याच्या मार्गावर
भूमीराजा न्यूज ,शहर प्रतिनिधी ,
कृष्णा राठोड -9145043381
हिमायतनगर/-
तालुक्यामध्ये पावसाने झोडपून काढले आहे, या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक तिन- ते चार तास बंद होती. याच बरोबर तालुक्यातील कमानी लगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने पुराच्या पाण्याने काही घरांना
वेढले आहे.
नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे व नाली नसल्याने या नाल्याच्या पुराचे पाणी शहरात येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
तालुक्यातील परिसरामध्ये आजमुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेती पिकामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचे राहिले ते पिकेही जाण्याच्या मार्गांवर आहेत, यामुळे शेतकरी पुन्हा अतिचिन्तेत असल्याचे दिसत आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवाती पासून
ते महिन्याच्या अखेर पर्यंत पाणी पडत झोडपत असल्याने , शेतकरी व शेतमजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहे.
शासनाने त्वरित नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी सर्व स्तरावरून होत असल्याचे दिसून येत आहे.