👉 तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीचा फटका.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 26 जुलै 2022
हिमायतनगर तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने दणका दिला आहे. नांदेड ते किनवट महामार्गावर अनेक नाल्यावरील पुलांचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने, पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन ते तिन तास वाहतूक बंद होती. हिमायतनगर शहराजवळील नाल्यावरून प्रचंड पाण्याचा प्रवाह सुरू असताना, ग्रामीण भागातील येणारी वाहने तिथेच थांबविण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यां रस्त्यावर पाणी पाणी दिसत होते. कोणी मोबाईल मध्ये वाहणा-या पाण्याचे दृश्य कैद केले आहेत. रेल्वेगेट पासुन मुख्य मंदिराच्या कमाप्रयंचया रस्त्याचे अर्धवट आहे. त्यामुळे साधारण पाऊस पडला की, वाहनधारकांना वाहणे चालवतांना कसरत करावी लागते.
संबंधित गुत्तेदार हा मोठ्या नेत्यांच्या मर्जीतील असल्याने आंदोलन करुन, विविध वृत्तपत्रांत बातम्याही देऊन त्या गुत्तेदारावर काहीच फरक पडत नाही. तुला वाटेल तेंव्हा काम कर पण रोडचे काम कर. असे म्हणण्याची वेळ आली आहे. असे नागरिक बोलवुन दाखवित आहेत.
खैरगांव पुलावरुन प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
👉 सवना येथील एका शेतकऱ्याची सायकल पुरात वाहून गेली.
आपला दैनंदिन दुग्धव्यवसाय करणारे तुकाराम शामराव जाधव सवना येथील शेतकरी, हिमायतनगर शहरातील दुधडेरीला दुध देऊन येत असतांना, त्यांना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांची सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
एकंदरीत या अतिवृष्टीने कहर केला आहे.