Home Breaking News पांगरा येथे सभामंडप बांधकामासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून १० लाख रुपये निधी ...

पांगरा येथे सभामंडप बांधकामासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून १० लाख रुपये निधी  मंजुर

वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या शिफारशीला दिला मान
———-
परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :– पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे सभामंडप बांधकामाकरीता महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य दुर्राणी अब्दुल्लाखान लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत १० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अशा असयाचे पत्र जिल्हाधिकारी परभणी यांना पाठवण्यात आले आहे. येथील सभामंडप बांधकामाकरीता वसमत विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी सार्वजनिक विकासाची नाळ अंगी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे शिफारस केली होती. त्यावरुन आमदार दुर्राणी यांनी आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या विनंतीला मान देत पांगरा लासीना येथील सभामंडप बांधकामाकरीता १० लाख रुपये निधी मंजूर करुन तो जिल्हाधिकारी यांना पत्र देवून ग्रामपंचायत पांगराला वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.पांगरा लासीना हे वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या मामाचे गाव असल्याने ते लहान वयात येथे आजोबा स्वर्गीय शेषरावजी ढोणे पाटील (बापू),मामा प्रकाशराव ढोणे पाटील,उत्तमराव ढोणे पाटील यांच्या कडे येजा करत असत.मामाचे गाव म्हणून त्यांचा पांगरा गावावर जिव्हाळा असल्याने एक कृतज्ञता म्हणून त्यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे निधीसाठी विनंती केली होती.शिवाय विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे देखील अतिशय मनमिळाऊ वृत्ती आणि कुणाचाही भेदभाव न करता कधीही संकटाला धावून येणारे, विकासासाठी मदत करणारे व्यक्तीमत्व आहेत. त्यामुळेच त्यांनी पांगरा गावात सभामंडप बांधकाम करण्यासाठी औदार्य दाखवल्यामुळे पांगरा गावकरी दोघाही आमदारांचे कौतुक करीत आहेत.

Previous articleअखेर भूमिराजा बातमीची दखल घेत; रस्त्यावरील काटेरी बाभळी तोडल्या.
Next articleराष्ट्रीय महामार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद.