अधुन -मधून पावसाची रिपरिप चालूच। शेतकरी चिंतेत!
हदगाव /हिमायतनगर तालुका प्रतिनिधी –
रवि पवार खडकीकर
मो.7350333415
हदगाव/ हिमायतनगर :–
तालुक्यातील शेतकरी सध्या शेतामधील कामाला लागले असून नुकसान होऊन उरलेल्या पिकांची पाहणी करत त्यावर फहवारणी करणे कचरा काढणे कोळफा हाणणे.त्याचबरोबर शेतकऱ्यांत सध्या कामाला चांगलाच वेग आल्याचा पाहण्यास मिळत आहे.
हिमायतनगर तालुक्यात यावर्षी सुरवातीला दोन दिवस योग्य पद्धतीने पावसाने सुरवात केल्याने तालुक्यातील काही सुखावलेल्या शेतकरी्यांनी कापसाची लावघड सोयाबीन पेरणी केली होती तर काही शेतकरी्यांनी कर्जबाजारी करून कापसाची लावघड करून सोयाबीन पेरणी असे या परिसरातील ८० टक्के शेतकरी्यांनी चांगल्या पद्धतीने मशागतीच्या कामाला सुरवात करून कापसाची लावगड सोयाबीन ची पेरणी केली होती परंतु पुन्हा या भागात पावसाने दहा ते बरा दिवस दांडी दिल्यामुळे शेतकरियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या भागातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आल्यावर तरी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्यावरही निसर्गाचा बद्दल होऊन आठ ते दहा दिवस सतत मुसळधार पावसाने हाजेरी लावली होती त्या आठ ते दहा दिवसाच्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नाले नदी ला क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्यामुळे तालुक्यात सगळीकडेच मोठ मोठे पूर आले होते काही भागात आलेले पुरामुळे तर हजारो हेक्टर जमिनीवरील पिके जमिनी खरडून वाहून गेले तर काही भागातील शेतकरी्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात तलावा सारखे पाणी साचून बसल्यामुळे पिके पाण्याखाली जाऊन हिमायतनगर तालुक्यातील सोनारी. करंजी जवळगांव दूधड वाळकेवाडी सरसम विरसणी वाघी दिघी खडकी कामारी पोटा परवा अंदेगांवसह ,कोठा , बोरगडी सह तालुक्यातील हजारो शेतकरी्यांच्या शेतातील पिकांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील बऱ्याच खेडेपाड्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रशासना सोबत पाहणी करण्यात आली आणि तालुक्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरीला मी माघे राहू देणार नाही असे आश्वासन ही करण्यात आलेले आहे परंतु दोन चार दिवसापासून पावसाची उघड झाली असून तालुक्यातील काही भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले तर तालुक्यातील काही भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची शासनाच्या अधिकाऱ्याकडून पाहणी सुद्धा करण्यात आलेली नसल्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकरी पुन्हा कामाला लागले यावर्षी निसर्गामुळे हिमायतनगर तालुक्यातील छोटे मोठे सर्वच शेतकरी्यासमोर निसर्गात सतत बद्दल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणते काम कराव कोणते काम करू नये हे कळतच नाही तर नेसर्गाच्या सतत बदलमुळे शेतकऱ्यांनी केलेले कोणते काम उलटेच होत असल्यामुळे शेतकरी पाऊस सुरू झाला की घामाकुल होऊन चिंतेत राहत आहे.