परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील धोतरा येथील रहिवासी , पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती,तथा पूर्णा पंचायत समिती (शिवसेना) गटनेते,माधव कदम पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने दि २० जूलै २०२२ रोजी सायंकाळी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांची भेट घेऊन अभिनंदन करुन त्यांना पूर्णपणे समर्थन दिले आहे. त्यांच्या समवेत सोनखेड (मोठी पांढरी) येथील कर्तव्यदक्ष सरपंच चंद्रकांत सुर्यवंशी पाटील, उपसरपंच दासराव देसाई यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल स्वागत करुन आशिर्वाद घेत समर्थन दिले. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते माधव कदम शिष्टमंडळाशी चर्चा करुन पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या आणि कामाला लागा मी तूमच्या पाठीशी आहे असे सांगितले.पूर्णा तालूक्यात शिवसेना पक्षास भरीव योगदान देणारे माजी उपसभापती माधव कदम, सोनखेडचे सरपंच चंद्रकांत सुर्यवंशी पाटील, उपसरपंच दासराव देसाई पाटील हे सदैव सामाजिक कार्यात सातत्य ठेवत असतात. जनसामान्य जनता, शेतकरी यांच्याप्रती त्यांचे योगदान असते.त्यांना पुढील राजकीय, सामाजिक वाटचालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य मिळणार असल्याने पूर्णा तालूक्यातील जनतेतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Home Breaking News माजी उपसभापती माधव कदम शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले भेटून समर्थन!