Home कृषीजागर हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शन सोहळा संपन्न.

हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शन सोहळा संपन्न.

कृष्णा घाटोळ
भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर.                     दि.20 जुलै 2022

बाळापुर – खरीफ पिक हंगाम चर्चा सत्र व शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि. 20 जुलै 2022 आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन हवामान अभ्यासक मा.श्री.पंजाब डख साहेब उपस्थित होते.आणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषी अधिकारी नंदकुमार माने , वाण विशेषतज्ञ कृषि बिजला ,वाशिम चे डॉ.भारत गिते , डॉ. प. दे. कृषी वि.चे वकील संशोधन शास्त्रज्ञ डॉ . निळकंठ पोटदुखे ,प.स.चे कृषि अधिकारी अरून कुमार मुंदडा , मंडळ कृषि अधिकारी शिवाजी जाधव , सिजेंटा चे इशांत पारस्कर , निर्मल चे संदिप पोहनकर ,तसेच बाळापुर शहराचे नगराध्यक्ष ऐनोद्दीन खतिब या कार्यक्रमाला उपस्थित होते . ह्या कार्यक्रमाला भरपुर प्रणामाणात शेतकरी बांधवांनी आपली उपस्थिती दाखवीली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्रीराम मंदिर बाळापुर येथे करण्यात आले . या कार्यक्रमात पंजाब डख यांनी शेतकर्याना फार मोलाचे मार्गदर्शन केले.

Previous articleविश्व मराठी कवी संमेलन दुबई येथे.. प्रा. डॉ. आनंद आहिरे यांची अध्यक्ष म्हणून निवड
Next articleमाजी उपसभापती माधव कदम शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले भेटून समर्थन!