Home Breaking News आज माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत केले जाहीर प्रवेश…..

आज माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत केले जाहीर प्रवेश…..

हिमायतनगर /- कृष्णा राठोड
हिंगोली लोकसभेचे कडवट शिवसैनिक म्हणून परिचित असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा आज दि 20 जुलै रोजी मुंबई मातोश्री येथे शिवसेनेचे पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यात आनंद साजरा करण्यात आला आहे

महाराष्ट्रात तापलेले शिंदे व ठाकरे हे राजकीय समीकरण पाहता अनेक नेते शिवसेनेला सोड चिठ्ठी देत असल्याचे पहायला मिळत आहे त्यातच हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा शिवसेनेला सोड चिठ्ठी देऊन ते शिंदे गटात गेल्याने हिंगोली मतदार संघात शिवसेनेची ताकत कमी होऊ नये म्हणून माजी आमदार नागेश पाटील यांच्या पुढाकाराने,जुने राजकीय मतभेद विसरून शिवसेना टिकविण्यासाठी त्यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे यांना शिवसेनेच्या संकटकालीन परिस्थितीत हिंगोली व नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकत पुन्हा वाढविण्यासाठी आज अखेर दि 20 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथील मातोश्री भवणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटी हे इतके दिवस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे पण यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्या मतदासंघांत शिवसेनेचे पक्षनेतृत्व हे स्वतःशिवसेना संघटना बांधणीसाठी कामाला लागून तात्काळ येथील जुन्या शिवसैनिकांना जवळ घेऊन पक्षसंघटना, पक्ष बांधणीचे काम आगामी काळात मोठ्या जोमाने करण्याचा विडा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे खा. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर पूर्वीचे शिवसेनेचे माजी खासदार आणि आता सध्याला काँग्रेसमध्ये असलेले सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन अखेर शिवबंधन बांधून घेतले व लवकरच हिंगोली लोकसभा मतदारसंघ शेत्रात शिवसैनिकांचा एक भव्य मेळावा घेऊन पक्षाची मजबुत बांधणी करणार असल्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी सांगितले त्यामुळे हदगाव शहरात युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील व भास्कर वानखेडे सह शिवसैनिकांनी आनंदत्सव साजरा केला

खा.हेमंत पाटील यांना शिवसेनेची बंडाळी भोवणा..का?

हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर सुद्धा शिंदे गटात लवकरच जातील अशी चर्चा सुद्धा रंगत आहे कारण विधानसभेच्या बंडखोरी नंतर त्यांना एकमेव खासदार हेमंत पाटील यांचे सहकार्य व रसद असल्याने ते शिवसेने सोबत टिकून होते पण आता तेच राहिले नसल्याने बंडखोर सुद्धा लवकरच शिंदे गटात जाण्याच्या तयारीत लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र ठाकरे गटातील माजी खासदार वानखेडे सोबत आष्टीकर तर शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील यांच्या सोबत कोहळीकर हे राजकीय पटलावरील सारीपाट मात्र आता चांगलाच रंगणार असल्याचे मतदार संघातील राजकीय मंडळींकडून बोलल्या जात आहे.

Previous articleऊसाच्या उत्पादन वाढीकरीता ड्रोनने विद्राव्य निवीष्ठांची फवारणी करणे आवश्यक-पूर्णा सहकारी साखर कारखान्याने केले प्रात्यक्षिक यशस्वी!
Next articleविश्व मराठी कवी संमेलन दुबई येथे.. प्रा. डॉ. आनंद आहिरे यांची अध्यक्ष म्हणून निवड