हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
दिनांक 18/7/2022 रोजी सिन्नर तालुक्यातील उजनी या गावी एक आगळा वेगळा विवाह संपन्न झाला आहेत. दोघे ही अपंग आहेत. अतिशय साद्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. थाटामाटात लग्न करणार तशी परिस्थिती पण त्या कुटूंबाची नाही व कुठल्याही खर्च न करता साधा सोहळा पार पडला. श्री जालिंदर व सारिका यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा
या विवाह प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु (भाऊ) बोडके , जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आदोःलनाचे अरुण (भाऊ) पाचोरकर आणि ईतर अपंग मंडळी तसेच ईतर नातेवाईक व मिञपरिवार उपस्थित होते.