Home Breaking News पिक विमा योजना: सहभागासाठी ई पीक पाहणी शक्‍तीची नाही

पिक विमा योजना: सहभागासाठी ई पीक पाहणी शक्‍तीची नाही

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पातूर : प्रधानमंत्री पीक योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2022 असून या योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद करणे शक्‍तीची नसल्याने कृषी आयुक्तांनी दिनांक 15 जुलै रोजी काढलेल्या पत्रकाद्वारे पोस्ट केले आहे. कृषी आयुक्तांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार, खरीप 2022 मध्ये या योजनेच भाग घेण्याचा अंतिम दिवस 31 जुलै 2022 आहे. शासनाचा ई-पीक पाहणी मध्ये पीक पेरण्याची नोंद घेण्याची कारवाई 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी पिक पाहणी नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेला पिक विमा व प्रत्यक्ष शेतात पेरलेले पिक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरतांना नोंदवलेले पिक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्यांनी पीक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणा पत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभागी घेऊ शकतो. मात्र 1ऑगस्ट 2022 नंतर ई-पीक पाहणी मध्ये आपल्या पिकांची नोंद करावी,असे आवाहन कृषी आयुक्त यांनी केले आहे.

Previous articleमहावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……
Next articleशहरात मुसळधार पावसामुळे नदी ला पुर