Home Breaking News महावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……

महावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……

👉 अधिकारी, कर्मचारी हे भ्रमणध्वनी उचलत नाहीत…..

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 17 जुलै 2022

खेडे हे देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. खेड्यातील लोकांना विकास झाल्याशिवाय, देशातील अंधार नाहीसा होणार नाही……
👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी

देश स्वातंत्र्याचा (75) वा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या जोरदार तयारीत आहे. पण वास्तविक पाहता, आजही ग्रामीण भागाचा विकास जसा व्हावा तसा झालेला दिसत नाही. कारण भ्रष्ट यंत्रना, कामचुकार पध्दतीने काम करणे, कर्मचाऱ्यांचा अभाव, वरीष्ठाचे मर्जी न राखणे, आदेशानुसार सेवेतील कामे न करणे, लोकप्रतिनिधीचे तेवढ्यापुरतेच एकुण काम करणे. काही दिवसांनी पुन्हा तेच कित्ता गिरविणे. असे एक नाही अनेक कारणे सांगता येतील.
आठ जुलै ते तेरा जुलै दरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. सतत पाऊस पडत होता. शहरी भागात सारखा विद्युत पुरवठा केला जात होता. पण ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा पुर्णतः तिनं ते चार दिवस अमुक तमुक कारणे सांगुन बंद केला जात होता. असो तेंव्हा तर पाऊस होता. पण आज रोजी साधा पंखांची फिरत नाही. अशीच लाईट होती. महिना जात नाही तोच दोन ते तीन हजार बिलं तयार करून आॅपरेटर बिल मागायला घरी येतो. का? केला जातो दुजेभावपणा ग्रामीण भागातील नागरीकांना कारण ग्रामीण भागात माणसे राहतात. जनावरे नाही… याचीही जाणीव असावी. लाईट भरपुर द्या बिलं हि घ्या…नां…भरुन ….पण त्या आधी लाईटचा भरपुर पुरवठा करा आधी…..अशी भावनिक हाक ग्रामीण भागातील लोक मारत आहेत.
देशाला पंचाहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवुन, पण आजहि पारतंत्र्यातील दिवस पाहायला मिळतात खेड्यात राहणाऱ्या लोकांचे हे दुर्दैव म्हणावं का? असा प्रतिप्रश्न नागरिक विचारत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस सतत पडतो आहे. साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डास माणसाच्या शरीरातील रक्त सोसत आहेत. विंचु , सापाची भिंती वाटते. फोन उचला..लाईट केंव्हा फुल येईल पप्पा अशी आर्त हाक लहान चिमुकले मारत आहेत…. थोडं बघा ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा कडे……अशी संतप्त भावना सवनेकरांनी सांगितल्या आहेत.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्य कामगार राहतात त्यांच्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. बळीराजा देशाला अन्न पुरवठा करतो. त्यांनाच अंधारात ठेवून, काय? साध्य करणार आहात तुम्ही….असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

👉 दोन दिवसात ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सरळ नाही झाल्यास, स्वातंत्र्य दिनी गावातील शेकडो नागरीकांना सोबत घेऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. असे सवना गावचे तंटामुक्ती गावसमितीचे अध्यक्ष कैलास अनगुलवार यांनी आमच्या प्रतिनिधींना कळविले आहे.

Previous articleधाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण
Next articleपिक विमा योजना: सहभागासाठी ई पीक पाहणी शक्‍तीची नाही