Home कृषीजागर धाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण

धाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण

परभणी, (आनंद ढोणे) :- नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालूक्यातील जामगे शिवणी शिवारात असलेल्या धाराशिव साखर कारखाना (डि व्ही पी उद्योगसमूह) युनीट ३ या खाजगी साखर कारखान्याने परभणी जिल्ह्यातील शेतक-यांचा शेकडो टनेज ऊस गळीत हंगाम २०२२ मध्य गाळपासाठी मे अखेर पर्यंत खरेदी करुन नेला. परंतू, असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देवू असलेली त्या ऊसाची देयके (बीले) अजूनही दिल्या गेली नाहीत. त्याच बरोबर तोडणी वाहतूक ठेकेदाराची शुध्दा बीले दिली नाहीत. गाळपासाठी ऊस जावून पाच महिने होत आहेत तरीही ऊसाचे पेमेंट देण्यात आले नाही. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील देगावचे रहिवासी असलेले उद्योगपती अभिजित धनंजय पाटील यांनी हा साखर कारखाना खरेदी करुन चालू केला आहे. त्यांच्या धाराशिव साखर कारखान्याचे (डि व्ही पी) उद्योगसमूहाचे एकूण ३ युनीट आहेत. त्यापैकी उर्वरित २ युनीट साखर कारखाने हे एक नाशिक तर दुसरा धाराशिव ( उस्मानाबाद) जिल्ह्यात आहे. यातील युनीट क्रमांक ३ हा लोहा तालूक्यातील शिवणी जामगे शिवारात टेकडीवर उभा आहे. हा साखर कारखाना पूर्वी स्वर्गीय उद्योजक संभाजी पवार यांनी उभारणी केला होता. मात्र, त्यांना हा कारखाना काही कारणास्तव चालू करता आला नाही. ते दिवंगत झाल्यावर त्यांचा मुलगा आमदार राजेश पवार यांनी कृषी उद्योजक अभिजित पाटील यांना विकत देण्यात आला आहे. सदरील साखर कारखाना हा गत तिन चार वर्षापासून गळीत हंगाम घेत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शिवारात ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड असते.हा साखर कारखाना शेतक-याचा ऊस दरवर्षी गाळपासाठी नेतो परंतु वेळेवर त्याची बिले देत नाही.असे शेतकरी नेहमी बोलून दाखवत असतात. त्यामुळे सदरील साखर कारखान्यावरील ऊस उत्पादक शेतक-यांचा विश्वास उडत आसून रोकलेली ऊसाची बिले त्वरीत देण्याची मागणी सबंधित ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.
शेतकरी प्रतिक्रिया:-
माझा ५० टन ऊस जामगे शिवणी येथील धाराशिव साखर कारखान्याने एप्रिल महिन्यात गाळपासाठी नेला आहे. अजून त्या ऊसाचे बील मिळाले नाही. माझ्यासह पूर्णा तालुक्यातील अनेक शेतक-यांनी या साखर कारखान्याला ऊस देला आहे. तेही रोजच बिले येण्याची वाट पाहत आहेत. धाराशिव साखर कारखान्याने पूर्णा येथे डि व्ही पी नावाने बॅंक उघडली आहे. तिथे शेतकरी बिलासाठी चकरा मारुन परेशान आहेत. ऊस पिकवण्यासाठी मोठा खर्च लागला. ऊस तोडणीसाठी एकरी वीस हजार खर्च आला आणि आता ऊस जावूनही बील भेटत नाही. यामुळे शेतक-याला ऊस पिकवून अन् विकूनही पैसे मिळत नसल्याने मरायची वेळ आली आहे. येत्या चार दिवसांत ऊसाचे बील द्यावे नाहीतर आम्ही साखर कारखान्यापुढे टेंट टाकून उपोषणाला बसणार आहोत.
शेतकरी आतमराव नागोराव ढोणे, पांगरा, ता पूर्णा. जि परभणी. मो 9579239319

Previous articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष आंबेकर
Next articleमहावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……