Home कृषीजागर अतिवृष्टीने “होत्याचं नव्हतं झालं”….

अतिवृष्टीने “होत्याचं नव्हतं झालं”….

👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी केली पाहणी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 16 जुलै 2022

हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी होऊन, 668.20 मिमी एवढा पाऊस पडला. शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. विविध वृत्तपत्रांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. काल हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांनी झंझावाती दौरा करत, पुरगृस्त भागाची पाहणी केली.

शेतकरी बांधवांना धिर देऊन, ते म्हणाले तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणतीही काळजी करु नका. असे म्हणत शेतकऱ्यांना समजावुन सांगीतले. यापुर्वीच आमदार साहेबांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहेत.

खरीप हंगामात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. पेरण्याही गतवर्षी पैक्षा उशिरा झाल्या. परंतु गेल्या आठवड्यात पाऊस प्रचंड पडला. आणि शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके होत्याचे नव्हते झाले. एवढे प्रचंड नुकसान झाले आहे. महागडे बियाणे, खते आणुन शेतात पेरणी केली खरी…पण. साहेब एका पावसानं होत्याचं नव्हतं झाले आहे हो…असे भावनाविवश होवून शेतकऱ्यांनी आमदार साहेबांना सांगितले.


शासनाने या बाबींचा गंभीर विचार करून, हेक्टरी 50,000 पन्नास हजार रुपयाची मदत देऊन, बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसुन, अर्थीक सहकार्य करावे अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleहिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका..
Next articleमहाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे साकडे :- अजयसिंह सेंगर