प्रभारी तहसीलदार म्हणून अवधाने रुजू…..
हिमायतनगर | कृष्णा राठोड/- तालुक्यात मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या खैरगाव फुलाजवळ हिमायतनगरचे तहसीलदार डी एन गायकवाड यांना अचानक दुपारी 3 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले त्यांचे प्रकृती सध्या स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले त्यामुळे त्यांच्या जागी आपत्कालीन परिस्थितीत प्रभारी तहसीलदार म्हणून आवधाने साहेब हे रुजू झाले आहेत .
Bhumiraja news!
विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर असलेल्या बोरी पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावचा संपर्क तुटल्याने परिसरातील शेतीमध्ये पाणी शिरून येथील पिके पूर्णतः पाण्याखाली गेले असल्याचे कळतात येथील तहसीलदार डी. एन .गायकवाड यांनी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यासह सकाळपासून ते गेले असतात दुपारी 3:00 वाजेच्या दरम्यान ते खैरगाव फाटा येथील पुला जवळ असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी हिमायतनगर येथील तहसीलदार पदाचा पदभार नांदेड येथील तहसीलदार आवधाने साहेब यांना देऊन येथील परिस्थिती हताळन्याच्या सूचना दिल्या असे वरिष्ठांनी सांगितले आहे.