Home Breaking News महावितरणचे कर्मचारी अतिवृष्टी मध्येही जीवाची पर्वा न करता बजावले आहे आपले कर्तव्य

महावितरणचे कर्मचारी अतिवृष्टी मध्येही जीवाची पर्वा न करता बजावले आहे आपले कर्तव्य

तालुक्यातील जनतेकडून महावितरण कर्मचाऱ्याचे सर्व स्तरावरुन व्यक्त होत आभार….

हिमायतनगर | कृष्णा राठोड
तालुक्यामद्ये आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु असून नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असुन अतिवृष्टीजन्य परस्थीती करता निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटून , जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक विभागाचे कर्मचारी घरी बसुन
कुंटुबा सोबत वेळ घालीत आहेत , पण महावितरणचे कर्मचारी मात्र भर पावसात , गावातील , शहरातील जनतेसाठी धडपड करत असुन आपले कर्तव्य निभावत आहेत . यामुळेच या अतिवृष्टी मध्ये विज खंडित न होता सुरळीत राहीली आहे.
महावितरणाचे कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता
विज पुरवठा सुरळीत ठेवन्याचा अतोनात प्रयत्न केले आहे . जनतेच्या सेवेसाठी ते तत्पर हजर रहिले आहेत .
अतिवृष्टी मध्ये भर पावसात फक्त महावितरणचे कर्मचाऱ्यांनीच जनतेला सेवा दिली आहे. या त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे.
तालुक्यातील महावितरणचे अभियंता, सहाय्यक अभियंता तसेच महावितरन चे सर्वच कर्मचारी जनतेला या भयंकर अतिवृष्टी मध्ये विज पुरवठा सुरळीत ठेवली आहे. या त्यांच्या कर्तव्याबद्दल ग्रामीण , व शहरी भागातील जनतेतून मोट्या प्रमाणात आभार व्यक्त होत आहे.

Previous articleशितल शेगोकार यांची स्त्रीशक्ती मंच संघटनेच्या बुलढाणा अध्यक्षपदी निवड
Next articleथेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने ग्रामीण जनता खुश!