शेगाव प्रतिनिधी
स्त्री शक्ती मंच संघटना संस्थापक अध्यक्ष सौ शारदा अतुल भुयार कारंजा लाड यांनी त्यांचे सामाजिक कार्य बघून त्यांचे स्त्री शक्ती मंच संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड केली. शितल शेगोकार सोशल वर्कर असून बुलढाणा जिल्हा पर्यावरण अध्यक्ष आहेत अंगणवाडी वर्कर आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग कोषाध्यक्ष आहे.. बुलढाणा उज्जैन कर फाउंडेशन जिल्हा दक्षता समितीच्या समन्वय क आहेत अशा अनेक संघटनेमध्ये त्यांचे कार्य चालू आहे त्यांना हिरकणी पुरस्कार राळेगणसिद्धी अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. तसेच बुलढाणा जिल्ह्यात मा जिजाऊ साहेब पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहेत. शितल शेवकर यांना स्त्री शक्ती मंच संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड केली संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत शहरापासून तर खेड्यापर्यंत प्रत्येक गावात महिलांचा सहभाग घेतला जाईल तळागाळातील महिलां ना एकत्र करून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवा यासाठी प्रयत्नमिळवा यासाठी प्रयत्न केले जातील अनेक शासनाच्या योजना प्रत्येक गरजवंतांना महिलांना पोहोचविल्या जातील हे या संस्थेचे वैशिष्ट्ये आहेत..