Home कृषीजागर बोरगडी,बोरगडी तांडा येथील हजारो एकर जमिनी पुराच्या पाण्याखाली….

बोरगडी,बोरगडी तांडा येथील हजारो एकर जमिनी पुराच्या पाण्याखाली….

शेतात ओढे, नाले, नदीचे पाणी साचल्याने कोवळे पिकाचे झाले आहे नुकसान…..

हिमायतनगर /-.कृष्णा राठोड
तालुक्यात आठवड्याभरा पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी ,नाले यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेता मध्ये साचले अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जन जीवन विस्कळीत झाले, असल्याचे चित्रपहायला मिळत आहे. तर पैनगंगा नदी काठच्या गावांना शेतकऱ्यांना या महापुराचे पाणी शेतात साचल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

बोरगडी, बोरगडी तांडा येथील नाल्याचे ,नदीच्या पुरच्या पाण्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे. तर तालुक्यातील बोरगडी, बोरगडी तांड्या सह धानोरा, कोठा, पळसपुर , डोल्हारी ,पवना- आंदेगाव , पांगरी खैरगाव, सावना , महादापूर , अनेका गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक गावांमध्ये हीच परस्थिती पाहण्यास मिळत आहे तर अनेक गावचा तालुक्यापासून संपर्क तुटल्याने जन जिवन विस्कळीत झाले आहे ,

त्यामुळे असंख्य नागरिक आपला जीव मुठीत धरून या मुसळधार पाऊसा पासून आपले संरक्षण करण्यासाठी ठिकाणी सहारा घेत आहेत तर तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थिती पाहणी करण्यासाठी हिमायतनगरचे तहसिलदार हे नॉट रिचेबल आहेत महसूल प्रशासन कर्मचारीही नेहमी नोट रीचेबल राहत आहेत पण . सध्यातरी नॉट रिचेबल न राहता त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन , पंचनामे करुन नुकसान भरपाईचे अहवाल सादर करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

भूमीराजा न्यूज शहर ,प्रतिनिधी
कृष्णा राठोड बोरगडीकर
📲 ९१४५०४३३८१

Previous articleगुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे.
Next articleपरभणी-हिंगोलीत संततधार पाऊस चालूच नदी नाल्यांच्या पुरामुळे सर्वत्र हाहाकार,खरीप पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत!!