Home कृषीजागर हदगांव – हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा….

हदगांव – हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा….

👉 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी दिले निवेदन

12 जुलै 2022
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड

हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी सत्ता असो कींवा नसो. पण तालुक्यातील सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजुर जनतेची कामे करणारे लोकप्रिय नेते म्हणून परिचित आहेत. हे कोणालाही सत्य नाकारता येत नाही.
आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री नां . एकनाथराव शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री नां श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन, हदगाव व हिमायतनगर तालुक्यात गेल्या पाच – सहा दिवसापासून सुरु असलेल्या, अतिवृष्टी पावसा मुळे मतदार संघातील शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यांची गांभीर्याने दखल घेऊन, झालेल्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ करून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्या संबधीचे आदेश देण्यात यावे. अशी मागनीं आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे साहेब यांनी तात्काळ नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वीपीन इटनकर यांना तातडीने पंचनामे करून, अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश भ्रमणध्वनी द्वारे दिले आहेत.
आपला नेता कसा असावा तर माधवराव पाटील जवळगावकर साहेबा सारखा असला. अशी मुक्ताफळे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी बोलुन दाखविली आहेत.

Previous articleहिमायतनगर तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे पुन्हा संकटात…
Next articleश्रीराम सेनेच्या वतीने मा.तहसीलदार साहेब, मा.गट विकास अधिकारी साहेब, मा.ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन