Home समाजकारण सन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……

सन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……

शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे

परभणी, (आनंद ढोणे पाटील) :-
कार्यकर्त्यांनी सन्यासी वृत्तीने समाजात काम केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही.त्यासाठी प्रकाश कांबळे यांचा आदर्श
ठेवून कार्यकर्त्यांनी समाजात निःस्वार्थ आणि त्यागी वृत्तीने काम करावे.
समाजाचा विकास आणि उद्धार होने केवळ अशक्य असल्याचे विचार परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी रीपाई नेते प्रकाश कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेल्वे इन्स्टिट्यूट पूर्णा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णेचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ दत्तात्रय वाघमारे होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र भिक्खु संघाचे महसाचिव पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महाथेरो, भदंत बोधिधम्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुप्रसिध्द जेष्ठ आंबेडकरवादी विचारवंत सुरेश गायकवाड,संविधान प्रबोधन चळवळीचे
कुशल संघटक भिमप्रकाश गायकवाड,
पत्रकार जगदीश जोगदंड, गट नेते उत्तम दादा खंदारे,
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रतिनिधी दादाराव पंडित ,शाहीर गौतम
कांबळे यांनी प्रकाशदादा कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या
कार्याचा आढावा विषद केला.

शिक्षणाधिकारी भुसारे पूढे म्हणाले की,
प्रकाश दादा कांबळे यांच्या निर्भिड वृत्ती आणि निर्णायक भूमिकेमुळेच पूर्णेच्या माध्यमिक
शाळेचे मैदान वाचले,अन्यथा काही भूमाफियानी शाळेचे मैदान गिळंकृत केले असते.ही व असे अनेक प्रसंग सांगून त्यांनी
प्रकाश दादांच्या निस्वार्थी जगण्याचे आणि त्यागाचे दाखले देऊन
त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव केला.

सुरेशदादा गायकवाड यांनी
प्रकाश दादा कांबळे यांच्या बद्दल गौरवउद्गार करतांना सांगितले की, मी प्रकशदादांच्या
दलित पँथर ते रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीतील प्रवासाचा प्रत्यक्ष साक्षीदार
आहे.हा माणूस प्रचंड स्वाभिमानी आणि
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर
प्रेम करणारा आहे.या माणसाने आयुष्यात
कधीच विचारांशी तडजोड करुन
आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वार्थातून
हित केले नाही. चळवळीत अनेक चटके
सहन केली,त्याची कुठे तक्रार केली नाही.
त्यामुळे समाजाने अशी निस्वार्थी माणसं जपली पाहिजे.प्रसंगी त्यांच्या पाठीशी
उभं राहिलं पाहिजे.असे आवाहनही त्यांनी
उपस्थितांना केले.

गटनेते उत्तम खंदारे,दादाराव पंडित,
शेख अहमद,शाहीर गौतम कांबळे ,जगदीश जोगदंड यांनी देखील प्रकाश दादा कांबळे यांच्या कार्य कतृत्वला आपल्या भाषणातून उजाळा दिला.
या प्रसंगी प्रकाशदादा कांबळे आणि सेवानिवृत्त कमांडर सुधीर जाधव
यांचा संविधान गौरव समिती पूर्णा,आणि
सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या
वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
शहरातील विविध पक्ष संघटनाच्या वतीनेही त्यांचा शाल,पुष्पहार,
भेटवस्तू
देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अशोक
कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन
कामगार नेते अशोक कांबळे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
विजयकुमार जोंधळे, शिवाजी वेडे, महानंद
गायकवाड,विशाल जोंधळे,सिध्दार्थ भालेराव,मोहन लोखंडे,मिलिंद कांबळे,
ॲड सूर्यकांत काळे,डॉ संदीप जोंधळे,
बौध्दाचार्य त्र्यंबक कांबळे, मुंजाजी गवळी, सखाराम डोंगरे,प्राचार्य केशव जोंधळे,गौतम काळे,भिमा वाव्हळे,
अमृत मोरे,शिवाजी थोरात,मुकुंद खंदारे, आदि सह संविधान गौरव समिती पूर्णा, व
सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटनेच्या
पदाधिकारी व सदस्यांनी तन मन धनाने सहकार्य केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.

Previous articleपुरांचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान.
Next articleअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.