Home कृषीजागर पुरांचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान.

पुरांचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान.

👉 शेतक-यांचे अश्रु अनावर !

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 09 जुलै 2022

सर्वत्र जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने, नालयाकाटच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी जाऊन, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान तहसीलदार साहेब यांनी तलाठी यांना पाहणीचे निर्देश देऊन आमच्या शेतकऱ्यांचे अश्रु पुसावेत असी विनंती सवना ज. येथील शेतकरी बालाजी बुटनवाड, राजेश्वर बुटनवाड यांनी अतिशय भावनिक आवाहन केले आहे.
भुमी राजा न्युज चॅनल चे प्रतिनिधीना आपल्या व्यथा भ्रमणध्वनीवरून सांगितल्यावर लगेच आमच्या प्रतिनिधीने पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांना आवर घातला.
हिमायतनगर तालुक्यातील आजपर्यंतच्या इतिहासातील हा पाऊस प्रचंड पडला. असे जाणकारांचे मत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी या पावसामुळे अत्यंत भयभीत झाले आहेत. कारण खुप कष्ट सोसत आम्ही बियाणे,खते आणुन काळया आईची ओटी भरली हो…असे एका शेतकऱ्यांने उभ्या डोळ्यात अश्रू आणुन सांगितले.
या सर्व पुर परीस्थितीचा महसुल , कृषि विभागाने गांभीर्य घेत वरीष्ठांना कळवुन येत्या दोन ते तिन दिवसांत नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून, ताबडतोब आर्थीक मदत द्यावी. अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleरिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे…
Next articleसन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……