Home Breaking News हिमायतनगर ते बोरगडी मुख्य रस्त्याचे चालू  असलेले काम थातूरमातूर .,..

हिमायतनगर ते बोरगडी मुख्य रस्त्याचे चालू  असलेले काम थातूरमातूर .,..

आमदारांनी हिमायतनगर ते बोरगडी रस्त्या साठीचे मंजूर करून आणलेल्या पाच कोटी रुपयांचे काय? ………..

हिमायतनगर :- कृष्णा राठोड
तालुक्यातील बोरगडी.धानोरा.
वा.टाकळी येथील नागरिकांना जीव मुठीत धरून घेऊन प्रवास करावा लागत होता ,नागरिकांना कोणत्या ना कोणत्या तरी समस्या समोर येऊन उभ्या रहात होत्या. शहराकडे जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा प्रवास आहे पन जागोजागी खडे व गिट्टी उघड्यावर पडले आहेत त्यामुळे अर्धातास ते पाऊन तास लागत होता.शहराकडे जाण्यासाठी, हिमायतनगर ते बोरगडी, धानोरा,वारंगटाकळी. या तीन गावचा दळण वळणाचा हा मुख्य रस्ता खड्यामुळे धोकादायक झाला होता. हिमायनगर तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगडी हनुमान मंदिर येथे दररोज भाविकांची वर्दळ असते,, भाविकांना दर्शनासाठी येण्यासाठी मुख्य रोडच पूर्ण पणे खड्डेमय झाला आहे, मागील तीन ते चार वर्षापासून या मार्गाचे काम रखडले होते अद्याप आता पर्यंत हा रस्ता झाला नाही.

पण काही दोन – चार दिवसापासून या रस्त्याचे थातुरमातूर काम चालू आहे,
त्यावर थोडी गिट टाकून मोठे खड्डे. बुजवण्याचे कामास सुरुवात करण्यात आली. जनतेला रस्त्यांसाठी आंदोलन करता येवु नये म्हणून गिट टाकून.त्यावर थोडे ऑईल मिश्रित डांबर टाकून
थातुरमातुर काम चालू आहे.श्रीक्षेत्र बोरगडी येथे आमदार माधवराव पाटील जळगावकरांनी हिमायतनगर ते बोरगडी रस्त्या साठीचे मंजूर करून आणलेल्या पाच कोटी रुपय आपण या रस्त्यासाठी मंजूर करून आणल्याचे स्पस्ट केले होते त्या कामाचे काय झाले असा सावाल् सुजाण नागरिकांना पडत आहे. पण या थातूर मातुर कोणताही सुद्धा

कोणताही बांधकाम अभियंता व लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही. बोरगडी तिर्थक्षेत्र असल्याने या रस्त्यावरून वाहनांची मोठी वाहतूक असते, तसेच याच रस्त्या पासून समोर बोरगडी तांडा १/२ धानोरा ,वारंगटाकळी हे तीनही गावे एकाच रस्त्यावर आसल्याने नागरीक दररोज मोठ्या प्रमाणात आपले काम घेऊन याच रस्त्याने हिमायतनगर शहराकडे जीव धोक्यात घालून जात आहेत.

असे असताना देखिल या भागातील खासदार,आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि ईतर लोक प्रतिनिधी काही याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, ईतर लोकप्रतिनिधी यांनी सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरून त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा डाव आखल्याचेच दिसत आहे. कारण चांगले रस्ते मिळणे हे सर्वसामान्य नागरीकांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु बोरगडी , बोरगडी तांडा, धानोरा वारंग-टाकळी ,या मुख्य मार्ग आसताना सुध्दा लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे.

येत्या कहि दिवसात जिल्हा परिषदा आणी पंचायत समितीची निवडणूक आहे, या निवडणुकिच्या पूर्वी या रोडचे काम चांगल्या प्रकारे करावेत , अन्यथा जनांदोलन करण्याचा इशारा गावाकऱ्यांनी / प्रवाशांनी दिला आहे.

कृष्णा राठोड
भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी, हिमायतनगर.
मो.९१४५०४३३८१

Previous articleहिमायतनगर तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक गावाचा तुटला संपर्क….
Next articleरिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे…