👉 शेतातील मातीचे कट्टे फुटुन, पिकांचे नुकसान.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 09 जुन 2022
संबंध जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
या पावसामुळे शेतातील शेतकऱ्यांनी माती वाहून जावु नये, म्हणून उन्हाळ्यात टाकलेले मातीचे कट्टे फुटुन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सध्या खरीप हंगामातील पिकांची अवस्था हि नाजुक आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जनावरांना चारा पाणी कसे करायचे हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांवर उभा ठाकला आहे.
या सततच्या पावसामुळे बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे.
असाच पाऊस अजुन काही दिवस सतत पडला तर शेतकऱ्यांचे उभी पिकांचे नुकसान होऊन, ती आडवी पडणार हे मात्र निश्चित आहे. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.