Home Breaking News मरसूळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य! वाहतूक ठप्प झाल्याने शेतकरी वैतागले!!

मरसूळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य! वाहतूक ठप्प झाल्याने शेतकरी वैतागले!!

परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील मरसूळ रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन पूर्णेकडे भाजीपाला वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे.संपूर्ण रस्त्यात चिखलच- चिखल झालाय.चिखलामुळे मरसूळ गावची वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत.
———–
पूर्णा तालूक्यातील मरसूळ हे गाव परभणी जिल्ह्यात “भाजीपाला उत्पादकांचे गाव” म्हणून सर्वदूर परिचित आहे. येथील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके घेतात.परंतू त्यांना पक्का रस्ताच नाही. भारत स्वतंत्र झाला तेंव्हा पासून येथील रस्त्याचे एकदाही डांबरीकरण करुन पक्का रस्ता केला नाही.प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री सडक योजनेत हा रस्ता घेतला नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही येथील रस्त्याचे एकदाही डांबरीकरण होवून पक्का रस्ता होवू नये? ही मोठी शोकांतिका आहे.

पांगरा-पूर्णा रस्त्यावर असेलेल्या नवीन हनुमान नगर वस्तीपासून मरसूळ गावाला जोडणारा २ किमी पेक्षा अधिक अंतराचा हा रस्ता अजूनही कच्चाच आहे. येथील रस्त्यावर कठीण ढबर आणि त्यावर कडक मुरुम टाकून दबईने दाबून पक्के मजबुतीकरण करण्याचे काम या भागातील एका माजी जिल्हा परिषद सदस्याने घेतल्याचे समजते. त्यांनी यंदा २०२२ च्या उन्हाळ्यात रस्त्याच्या मजबूतीकरणाचा प्रारंभ केला परंतु त्या ठिकाणी कठीण ढबर न टाकता चुनखडू मातीमीश्रीत खडक टाकून थातूरमातूर सवान केला. बाहेरुन कठीण खडक न आणता रस्त्या किनारीच पोकलॅनने खोदकाम करुन ठिसूळ मातीमीश्रीत खडक टाकला त्यामुळे आता पाऊस पडताच रस्त्यावर चिखलच-चिखल निर्माण झाल्यामुळे येथून पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहतूक करणे तारेवरची कसरत झाली आहे. रस्त्यावरुन भाजीपाल्याचे ओझे नेता येत नाही की, कोणत्या वाहनासही रहादारी करणे मुश्किल झाले आहे. मोटारसायकल चाकात चिखल अडकून जॅम होत आहेत.

दररोज शेकडो क्विंटल उत्पादीत होणारा भाजीपाला वाहतूकी अभावी शेतातच सडू देण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. तसेच येथून बरेच विद्यार्थी- विद्यार्थीनी पूर्णा येथे शाळा महाविद्यालयाला येजा करतात. त्यांच्याही शिक्षणावर वाहतूक ठप्प होत असल्याने गडांतर येत आहे. मरसूळ गावची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली आहे. तेथील नागरीकांना कुठूनच पूर्णाकडे अथवा ईतर कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसरा रस्ता नाही. एकतर या चिखलमय रस्त्यावरुन जावे लागते नाहीतर कॅनाल मार्ग तेथेही पावसाळ्यात चिखलच असते. “ईकडे आड तर तिकडे विहीर” असी बिकट अवस्था वाहतूक ठप्प होत असल्याने मरसूळकरांची झाली आहे. दरम्यान, सदरील गुत्तेदाराने अंदाजपत्रकाला फाटा देवून मनमानी पध्दतीने ह्या रस्त्याचे कच्चे मजबुतीकरण करुन पोबारा केला खरा परंतु त्याचे परिणाम शेतकरी गावकऱ्यांना भोगावे लागत आहेत.ग्रामस्थ सांगतात की, आम्हाला पहिलाच रस्ता बरा नव्हता का मग, त्यावरुन कसे बसे जाता तरी येत होते, आता तर मातोडी टाकल्याने सारा चिखोलच करुन टाकलाय, आम्ही जावे कसे? कोणाला अडचण सांगावी?आम्हा गरीबांचे कोण ऐकणार?असे यक्ष प्रश्न ग्रामस्थ नागरीक बोलून दाखवत आहेत.

या समस्याकडे जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून रस्त्यावरील चिखलाचा बंदोबस्त करुन वाहतूक सुरळीत करुन द्यावी. असी मागणी गावक-यातून जोर धरीत असून गावकरी आंदोलन उभारण्याची तयारी करणार असल्याची चर्चा चालू आहे.
पांगरा गावाजवळील रस्त्यावरही चिखलय परिस्थिती
पांगरा लासीना गावापासून पूर्णेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर लोखंडी पूल ते चिंचेचे झाड बसस्थानका पर्यंत रस्ता उखडून जावून तेथे मोठ मोठी खड्डे पडलेत.त्यात पाणी साचून डोह होतो. शिवाय, रस्त्यावर माती असल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. येथून देखील रहादारी करणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर कार्यरत असलेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता दिपक हे जाणिवपूर्वक दूर्लक्ष करतात. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवित नाहीत की रस्त्यावर लोंबकळलेल्या काटेरी वेड्या बाभळा तोडून रस्ता मोकळा करीत नाहीत.

Previous article१३ जुलै रोजी जिल्हा परिषद , पंचायत समितीचे आरक्षण सोडत होणार जाहीर…
Next articleजवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यात संकेत गटकपाड दुसरा….