परभणी, (आनंद ढोणे पाटील)-पालम तालूक्यातील गोदावरी नदी पात्रात मधोमध असलेल्या प्रसिद्ध जांभूळ बेटावर निसर्ग प्रेमी, वृक्षमित्र,पतंजली योग परिवार व पूर्णा शहरातील आनंदनगर येथील ओमशांती सेंटरच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वृक्षारोपण करण्यात येवून भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी, कृषीभूषण कांतराव झरीकर,पतंजली योग परिवाराचे जिल्हा प्रमुख अनिल अमृतवार, नांदेड येथील वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख संतोष मुगटकर,जांभूळ बेट येथले सरपंच राम कदम, कृषीभूषण भगवान ईंगोले,दत्ता भाऊ बोंढारकर, ब्रम्हकुमारी सोनल यांच्यासह काही डाॅक्टर मंडळी आणि व्यवस्थापक यांनी परीसरात सफाई करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी १२९ विभूती उपस्थित होत्या. छोट्या मुलापासून वयोवृध्दापर्यंत सर्वांनी ” एक झाड लावा, प्रकृतीला वाचवा” असी उद्घोषणा करीत वृक्ष लागवड केली. या प्रसंगी, ब्रम्हकुमारी प्रणिता दिदी म्हणाल्या की, “खरी शांती प्रकृतीच्या सानिध्यात मिळते” यंदा मे महिन्यात जांभूळ बेट संवर्धन समितीने जांभूळ बेटावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले होते त्यावरुन विविध क्षेत्रातील निसर्ग प्रेमी आता पाऊसाळा चालू झाल्यामुळे क्रमाक्रमाने वृक्ष लागवड करीत आहेत.