Home Breaking News काटेरी वेड्या बाभळींनी घेरले पांगरा-पूर्णा रस्त्याला!

काटेरी वेड्या बाभळींनी घेरले पांगरा-पूर्णा रस्त्याला!

कार्यरत रोड गॅंगमेन सुस्त!!

परभणी, (आनंद ढोणे पाटील) :– जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा रस्त्याला सध्या काटेरी वेड्या बाभळींनी घेरल्याचे पहावयास मिळत आहे.रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर वेड्या बाभळींचे प्रस्थ वाढले आहे. सदरील रस्ता हा परभणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो. रस्त्याच्या कडेला किनाऱ्यावर वाढलेली झाडेझुडूपे तोडून घेऊन वाहतूकीसाठी येणारा अडथळा दूर करण्याकरीता सदर रस्त्यावर काम करण्यासाठी काही रोड गॅंगमेनची नियुक्ती असते. हे कार्यरत गॅंगमेन काहीच काम न करता फुकट पगार उचलून शासनाची फसवणूक करीत आहेत.मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढली असताना ते सुस्त आहेत. या रस्त्यावर पांगरा गावापासून पूर्णेकडे जाताना लोखंडी पुलापासून हनुमान नगर ते पुढेही काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा काटेरी वेड्या बाभळी वाढून त्यांनी वाहतूक रस्ता व्यापून टाकला आहे. येथून येता जाता जनावरांना व माणसाला फांद्या- काटे झपाझप लागत आहेत. रात्रीच्या वेळी शेतकरी येथून शेताकडे येजा करतात त्यांनाही रस्त्यावर लोंबकळत राहणा-या काटेरी वेड्या बाभळींचा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही सबंधित खात्याचे अभियंता, रोडकारकून, गॅंगमेन हे याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत, की वाढलेल्या काटेरी बाभळा तोडीत नाहीत. तसेच रोडवर साचलेले पाणी गॅंगमेन काढून देत नाहीत.गॅंगमेन दररोज दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात व कार्यालयाच्या आवारात बसून राहतात. याकडे परभणीच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज असून काटेरी वेड्या बाभळी तोडून रस्ता खुला करण्यात यावा असी मागणी पांगरा, वाई, पिंपळा, लोण-धार येथील नागरीकांनी केली आहे.

Previous articleपूर्णेतील अंडरग्राउंड रेल्वे पूलाखाली पाणी साचल्याने रहादारीस मोठा अडथळा
Next articleनिसर्गप्रेमींनी केले जांभूळ बेटावर वृक्षारोपण