परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा शहरातील एस्सार पेट्रोल पंपाजवळील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या लोहमार्गावर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने अंडरग्राउंड पूल बांधून तो कार्यान्वित केला आहे. त्या पुलाखाली सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने तेथून येणारी जाणारी दुचाकी, चारचाकी मोटार वाहने पाण्यात डुबत आहेत.यामुळे रहादारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
पाऊसाळा सुरु झाला की, ज्या ज्या वेळी मोठा पाऊस पडला त्यावेळी येथील पुलाखाली पाणी साचून तेथे पुराचे स्वरुप येत आहे. त्यामुळे अनेक तास पाणी ओसरे पर्यंत वाहन चालकास मोठी तारेवरची कसरत करुन वाहने काढावी लागत आहेत.पाण्यात वाहने डुबताहेत त्यात पाणी सिरत आहे. येथे तयार करण्यात आलेल्या अंडरग्राउंड पूलाखालचे पाणी वाहून जाण्यास उतार करुन दिला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे.साचत असलेले पाणी उताराच्या दिशेला नाली खोल खोदून घेतल्याशिवाय पाणी वाहून जाणार नाही. असी अवस्था आहे. दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. पूर्णा हे तालूक्याचे व बाजारपेठेचे ठिकाण असल्यामुळे येथे शासकीय, बाजारहाट,दवाखाना व ईतर कामासाठी रोजच नागरीक येजा करतात. शिवाय शाळा महाविद्यालय चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील दररोज येजा करावी लागते.
साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक करता येत नसल्याने विद्यार्थी वेळेवर शाळा महाविद्यालयात जावू शकत नाहीत. येथे ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. नागरीकाबरोबरच त्यांनाही वाहतूकीत अडथळा सहन करावा लागत आहे.येथील अंडरग्राउंड पूलाखाली साचलेले पाणी काढून देण्याची सबंधित खात्याने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. असी मागणी शहर व ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यातून जोर धरीत आहे.