वळण रस्त्याने जातांना वाहनधारकांना कसरत करावी लागते.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 03 जुलै 2022
नाशिक- निर्मल महामार्गावरील सवना गावच्या हद्दीतील पहिल्या नाल्यावर या भागातील नागरिकांनी पुलाची मागणी केली होती. नागरीकांची मागणी लक्षात घेता, आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी या पुलास मंजुरी मिळवुन दिली.
परंतु उन्हाळ्याच्या सुरु होताच, चार महिने झाले संबंधित शासकीय गुत्तेदार यांनी जुन महिना संपला तरी पुलाचे काम पूर्ण केले नाही. बाजुच्या वळन रस्त्यावरून चारचाकी, दोनचाकी वाहन धारकांना पाऊस पडला की, अतिशय कसरत करावी लागते आहे. पावसाळा सुरू झाला. एक महिना संपला तरीही हा पुल अजुन अपुर्णच आहे. या महामार्गावर प्रचंड मोठी वाहतुक आहे. परंतु कुणाचेच या मोठ्या पुलाच्या कामाकडे लक्ष का ? नसावे हाही प्रश्न अनुत्तरितच असुन, तेवढाच चिंतनाचा देखील आहे.
या पुलाच्या एका बाजुने रस्ता सरळ केला आहे. परंतु पुल पुलावरुन जातांना दुस-या बाजूला मुरुमाचा मोठा ढिग दिसतो आहे.
आजपर्यंत तरी कोणता अभियंता या पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी या पुलाची पाहणी केली आहे का? केली असेल तर पुल आजतागायत अपुर्ण का? राहिला. हाही संशोधनाचा विषय आहे.
त्वरीत येत्या काही दिवसांत पुलांचे काम पुर्ण करुन या भागातील सामान्य, आदिवासी, शेतकरी, मजुरदार ,प्रवाशी यांना दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.