Home Breaking News सर्वच सिम कार्ड कंपनीची कनेक्टिव्हिटी होतेय गायब

सर्वच सिम कार्ड कंपनीची कनेक्टिव्हिटी होतेय गायब

सिम कार्डधारक ग्राहक त्रस्त!
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यात गत काही दिवसापासून ओडाफोन- आयडिया ( व्हि आय), जिओ, एअरटेल या खासगी मोबाईल सिम कार्ड असणाऱ्या कंपन्यांची नेटवर्क कनेक्टिव्हिटी गायब होत आहे.

त्यासोबतच भारत संचार निगमच्या बि एस एन एल सिम कार्डची देखील तीच परिस्थिती आहे. नेटवर्क कनेक्टिव्हिटी अधूनमधून गायब होत असल्याने असंख्य सिम कार्डधारक ग्राहक त्रस्त होत आहेत.कधी मोबाईलच्या स्क्रिनवर टावर काड्या दाखवते तर कधी टावर काड्या (नेटवर्क) कमी अधिक होतच राहतात. यामुळे फोन संपर्क होतच नाही. तसेच नेट शुध्दा चालत नाही. अनेक वेळा तर संपूर्णच नेटवर्क कनेक्टिव्हिटी दोन दोन दिवस गायब होवून सिम कार्ड चालतच नाही. यात अधिक करुन व्हि आय सिम कार्ड कंपनीचा समावेश आहे.२८ दिवसाकरीता रिचार्ज किंमत वाढवूनही सेवा मिळत नसल्यामुळे ग्राहक वैतागून गेले आहेत. ग्राहक सातत्याने सबंधित सिम कार्ड कंपनीच्या कस्टमर केअर प्रतिनिधीशी बोलून तक्रार करुनही कनेक्टिव्हिटी सुरळीत होत नाही. प्रत्येक कंपनीकडे सिम कार्डधारक ग्राहकात वाढ झाल्यामुळे एकाच वेळी अनेक ग्राहक नेटवर्क मध्ये व्यस्त असतात. यामुळे कनेक्टिव्हिटीवर लोड येवून ती जाम होते. शिवाय ढगाळ हवामान, पाऊस वारा यामुळे देखील नेटवर्क कनेक्टिव्हिटी चालत नाही,

असे कस्टमर केअर प्रतिनिधीकडून उत्तर दिल्या जाते. असे असताना मात्र मोठी रक्कम रिचार्ज मध्य खर्च करुनही सेवा मिळत नसल्याने स्मार्ट मोबाईलधारक ग्राहक आपापल्या सिम कार्ड कंपनीच्या नावे बोटे मोडून राग व्यक्त करीत आहेत.काही सिम कार्ड कंपनी नवीन सिम घेण्यासाठी मोफत ऑफर देत असल्यामुळे बहुतांश नागरिक दोन दोन सिम कार्ड घेऊन वापर करीत आहेत. त्यामुळे नेटवर्क टाॅवरवर लोड येत असेल, असेही काहींचे म्हणने आहे.

तरी देखील असी समस्या असताना नेटवर्क कनेक्टिव्हिटी सातत्याने सुरळीत राहण्यासाठी सिम कार्डधारक ग्राहक आपला हक्क ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन बजावण्याच्या तयारीत असून वेळप्रसंगी आंदोलनही करु शकतात असी परिस्थिती नेटवर्क कनेक्टिव्हिटी गायब होत असल्याने निर्माण झाली आहे.

Previous articleहिमायतनगर पंचायत समिती कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषी दिन कार्यक्रम संपन्न !
Next articleमा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा